Home /News /lifestyle /

Shukra Margi 2022: उद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम

Shukra Margi 2022: उद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम

Shukra Margi 2022: उद्या दुपारी 02:14 वाजता शुक्राचे भ्रमण होईल. द्रुक पंचांगानुसार शुक्र 27 फेब्रुवारीपर्यंत धनु राशीत राहील, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. मार्गी शुक्राचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल याविषयी (Shukra Margi 2022) जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जानेवारी : शुक्र ग्रह उद्या 29 जानेवारी रोजी धनु राशीत प्रवेश करत आहे, म्हणजेच आता हा ग्रह राशीत सरळ चालीमध्ये मार्गक्रमण करेल. उद्या दुपारी 02:14 वाजता शुक्राचे भ्रमण होईल. द्रुक पंचांगानुसार शुक्र 27 फेब्रुवारीपर्यंत धनु राशीत राहील, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:37 पासून शुक्र मकर राशीत भ्रमण सुरू करेल. शुक्राच्या या चालीमुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडतील. मार्गी शुक्राचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल याविषयी (Shukra Margi 2022) जाणून घेऊया. शुक्राची चाल कोणाला ठरेल लाभदायक मेष : शुक्राचे हे मार्गक्रम असल्यामुळे मेष राशीच्या लोकांचे भाग्य चांगले राहील. उत्पन्न वाढल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल आणि कामात यश मिळेल. वृषभ: गोचर शुक्र वृषभ राशीच्या लोकांना लाभाच्या संधी देईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते. मिथुन: शुक्र ग्रहामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि यशाच्या संधी उपलब्ध होतील. कर्क : कर्क राशीच्या लोकांना शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळू शकते. शुक्राच्या या भ्रमणामुळे या राशीच्या लोकांचा प्रभाव वाढेल. सिंह : मार्गी शुक्रामुळे अडकलेला पैसा परत मिळू शकेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. योजना यशस्वी होतील आणि शिक्षणात मोठे यश मिळू शकेल. कन्या : शुक्र ग्रह तुम्हाला संपत्तीचा लाभ देऊ शकतो. कोणतीही जमीन, घर, प्लॉट घ्यायचा असेल तर ही वेळ अनुकूल आहे. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र तूळ: स्वामी ग्रह शुक्राच्या या भ्रमणामुळे नोकरीचे योग निर्माण होतील. नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल, तर वेळ तुमच्या सोबत आहे. वृश्चिक : प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर करा. शुक्राचे हे भ्रमण असल्यामुळे गुंतवणूक लाभदायक ठरेल. धनु: या राशीत शुक्राचे भ्रमण आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येत आहे. धनलाभ आणि गुंतवणुकीतून लाभ होईल. यश आणि कीर्तीमध्ये वाढ होईल. हे वाचा - या 5 राशींच्या लोकांना फेब्रुवारी महिना जाणार जड; अस्ताला जाणारा शनी लागोपाठ आणेल संकटं मकर : शुक्राचे भ्रमण असल्याने थोडे संयमी जीवन जगावे लागेल. फालतू खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कुंभ : शुक्राचे हे भ्रमण व्यवसायात लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. मात्र, शहाणपणाने निर्णय घ्या. मीन : शुक्र ग्रह तुम्हाला धनलाभ मिळवून देईल. कार्यक्षेत्रात तुमची क्षमता वाढेल, ज्यामुळे यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य राशिभविष्याच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या