Home /News /lifestyle /

उद्यापासून 'या' राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढणार, 18 जूनला होतोय शुक्राचा प्रवेश

उद्यापासून 'या' राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढणार, 18 जूनला होतोय शुक्राचा प्रवेश

Venus Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह प्रत्येक महिन्यात संक्रमण करतात. अशा स्थितीत त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. 18 जून रोजी शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशीचे लोक श्रीमंत होणार आहेत. चला शोधूया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जून : ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) नवग्रह, 27 नक्षत्रं आणि बारा राशींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व घटक माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात. प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशिपरिवर्तन करतो. या संक्रमण स्थितीचा परिणाम मानवी जीवनावर पाहायला मिळतो. नवग्रहांमध्ये शुक्र (Venus) या ग्रहाच्या आधिपत्याखाली भौतिक सुख, पैसा, धनलाभ, वैवाहिक जीवन आदी गोष्टी असतात. कुंडलीमध्ये शुक्र सुस्थितीत असेल या अनुषंगाने शुभ फळं संबंधित व्यक्तीला मिळतात. अशा व्यक्ती खूप प्रभावशाली असतात. उद्या (18 जून) शुक्र मंगळाच्या मेष राशीतून वृषभ (Taurus) या स्वराशीत प्रवेश करत आहे. शुक्राचं हे राशिपरिवर्तन चार राशींसाठी (Zodiac Signs) विशेष फलदायी ठरेल, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. याविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे. उद्या शुक्र वृषभ राशीत प्रवेश करत आहे. 13 जुलैपर्यंत शुक्र वृषभ राशीतून संक्रमण करणार आहे. त्यानंतर तो बुधाच्या मिथुन (Gemini) राशीत प्रवेश करील. शुक्राचं वृषभ राशीतलं भ्रमण मेष, कर्क, सिंह आणि मीन राशीच्या लोकांना विशेष फलदायी ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, पदोन्नती, यश मिळेल. तसंच करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं. मेष (Aries) : शुक्राचं वृषभ राशीतलं भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी ठरेल. 13 जुलैपर्यंत कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. या कालावधीत व्यवसायातून चांगला लाभ होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवी नोकरी मिळू शकते. या कालावधीत एखादा मोठा सौदा फायनल होऊ शकतो. आचार्य चाणक्यांच्या या टिप्स नेहमी ध्यानात ठेवा; कोणत्याही क्षेत्रात तुम्ही नंबर वन राहाल कर्क (Cancer) : या कालावधीत कर्क राशीच्या व्यक्तींचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. दीर्घ काळापासून अडकलेले पैसे या कालावधीत परत मिळतील. हे संक्रमण आर्थिकदृष्ट्या फायदा देणारं ठरेल. वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. खूप दिवसांपासून मनात असलेली इच्छा या कालावधीत पूर्ण होईल. सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी शुभ फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात विशेष लाभ होतील. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळेल. नव्या संधी मिळतील. या कालावधीत मेहनतीचं फळ मिळेल. तसंच नशिबाची साथ लाभेल. मीन ( Pisces) : शुक्राचं संक्रमण मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. कष्टाचं चीज होईल. या कालावधीत लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. तसंच त्यातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Zodiac signs

    पुढील बातम्या