Home /News /lifestyle /

हृदयविकारानंतर नियमित Sex फायद्याचं की तोट्याचं? नव्या संशोधनात पुढे आले फायदे

हृदयविकारानंतर नियमित Sex फायद्याचं की तोट्याचं? नव्या संशोधनात पुढे आले फायदे

हृदयविकारानंतर पूर्ववत सेक्स लाईफ जगल्यास नंतर हृदयविकराचा झटका येण्याचा धोका कमी असतो, असं एका अभ्यासातून समोर आहे.

    तेल अवीव (इस्रायल), 25 सप्टेंबर : हृदयविकारानंतर पूर्ववत सेक्स लाईफ जगल्यास नंतर हृदयविकराचा झटका येण्याचा धोका कमी असतो असं एका अभ्यासातून समोर आहे. ज्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आधीप्रमाणेच सेक्स केल्यास पुन्हा झटका येण्याचा संभव असतो, असा समज समाजात प्रचलित आहे. पण नव्या अभ्यासानुसार जर तुम्ही हृदयविकारानंतर पूर्ववत सेक्स करू शकत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी आहे, असं नव्या संशोधनात स्पष्ट झालं आहे. नियमित सेक्स लाइफ असणं आरोग्यदायी आहे आणि यामुळे तुम्ही दीर्घकाळ जगू शकाल, असं नवं संशोधन युरोपियन जर्नल ऑफ प्रीव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजीमधील लेखात प्रसिद्ध झाल्याचं CNNच्या वृत्तात म्हटलं आहे. या नव्या अभ्यासासाठी संशोधकांनी 495 दाम्पत्यांसोबत 20 वर्षं संशोधन केलं. त्यानंतर असा निष्कर्ष काढला की, हृदयाचा झटका आल्यानंतर ज्यांनी पुन्हा लैंगिक आयुष्याकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना हृदयविकारानी मृत्यु येण्याचा धोका तसा निर्णय न घेणाऱ्यांच्या तुलनेत 35 टक्के कमी आहे. हृदयविकार झाल्यानंतर पुन्हा लैंगिक जीवनाकडे वळल्याने निरोगी कार्यशैली, तरुणपणा, उत्साह परत येतो व निरोगी जीवनशैली परतते, असं इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील प्राध्यापक यारीव गर्बर यांनी म्हटलं आहे. हृदयविकारात अचानक शारीरिक परिश्रमांबात चिंता व्यक्त केली जातेच. मात्र, यातून बचाव झालेल्या लोकांनी शारीरिक हालचाली वाढवल्या. नियमित व्यायाम केला त्यामुळे त्यांना हृदयाशी संबधित अन्य समस्यांची जोखीम राहिली नाही. व्यायाम केल्याने धोका टळतो, असंही संशोधकांचं म्हणणं आहे. काही प्रकरणांमध्ये सेक्स ॲक्टिव्हिटी हृदयावर परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत. ज्यांना 1992-93 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता अशा ६५ वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या 495 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यांचं सरासरी वय 53 होतं आणि त्यात 90 टक्के पुरुष होते. संशोधकांना 22 वर्षानंतर आढळलं, यातील 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह स्थूलपणा, व्यायामाची कमतरता अशा अनेक बाबी या रुग्णांमध्ये संशोधकांना आढळल्या. यासह जे लोक नियमित पायऱ्या चढतात व जॉगिंग करतात किंवा सेक्स लाईफकडे वळतात ते निरोगी राहू शकतात, असे गर्ब यांनी म्हटलं आहे. तरुणवयात पुरुषांपेक्षा तरुणींमध्ये हृदयविकार होण्याचा धोका कमी असतो, यासह नियमित सेक्स ॲक्टिविटी ही निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे अभ्यासावरून हे समोर आले आहे की, हृदयविकारानंतर लोकांनी सेक्स लाईफमध्ये परतताना चिंता करू नये, असे गर्बर यांनी म्हटलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या