मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pregnancy Tips: प्रेग्नन्सीदरम्यान योगासनं करावीत की नाही? कुठला व्यायाम आहे सर्वोत्तम?

Pregnancy Tips: प्रेग्नन्सीदरम्यान योगासनं करावीत की नाही? कुठला व्यायाम आहे सर्वोत्तम?

बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. बाळंतपण सोसण्याची शक्ती आणि ताकद व्यायामाद्वारे स्त्रियांना मिळते. पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहण्याची क्षमता वाढते.

बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. बाळंतपण सोसण्याची शक्ती आणि ताकद व्यायामाद्वारे स्त्रियांना मिळते. पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहण्याची क्षमता वाढते.

बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. बाळंतपण सोसण्याची शक्ती आणि ताकद व्यायामाद्वारे स्त्रियांना मिळते. पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहण्याची क्षमता वाढते.

नवी दिल्ली, 15 जुलै : दिनक्रमात नियमित असाव्यात, अशा गोष्टींमध्ये व्यायामाचा (Exercise) समावेश होतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकानं जमेल व झेपेल तेवढा व्यायाम रोज केला पाहिजे. यात स्त्रिया व पुरुष दोघांचाही समावेश असावा. इतकंच नाही, तर स्त्रियांनी गरोदरपणातही (Exercise In Pregnancy) विशिष्ट व्यायाम केला पाहिजे, असं आरोग्यशास्त्र सांगतं. व्यायामुळे आरोग्य चांगलं राहतं, शिवाय मनावरचा ताणही कमी होतो. बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. बाळंतपण सोसण्याची शक्ती आणि ताकद व्यायामाद्वारे स्त्रियांना मिळते. पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहण्याची क्षमता वाढते. गरोदरपणातील व्यायामाचे फायदे सांगणारं वृत्त इंडिया टीव्हीनं दिलं आहे. गरोदरपणात शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी (Physical And Mental Fitness) व्यायाम खूप फायदेशीर ठरतो. नियमित व्यायामामुळे पाठदुखी (Back Pain), बद्धकोष्ठता, सूज, गॅसेसमुळे पोट फुगणं या तक्रारी कमी होतात. तुमचा मूड चांगला राहतो, झोप नीट लागते. दिवसभर कामासाठी ऊर्जा (Energy) मिळते. अनावश्यक वजनवाढीला यामुळे आळा बसतो. स्नायू बळकट होतात. हृदयाचं व रक्तपेशींचं कार्य सुरळीत राहतं. व्यायामामुळे शरीराची ठेवण (Posture) व्यवस्थित राहते आणि पोटाकडच्या बाजूचं वजन वाढलं तरी व्यवस्थित तोल सांभाळता येतो. ताण, निराशा, चिडचिड हेदेखील व्यायामामुळे कमी होते. गरोदरपणात रक्तदाब नियंत्रणात राहण्यात यामुळे मदत होते. तसंच गरोदरपणातील मधुमेह (gestational diabetes) उद्भवण्याचा धोका कमी होतो. व्यायाम केल्यामुळे सीझेरियन प्रसूतीची शक्यता कमी होते. शरीराचं चलनवलन कायम राहिल्यानं नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते. प्रसूतीनंतर झीज भरून काढण्यासाठीही शरीराला व्यायामामुळे ताकद मिळते. मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण न राहण्याची समस्याही यामुळे उद्भवत नाही. गरोदरपणात आठवड्यातून 4 ते 5 दिवस व्यायाम केला पाहिजे. यात ब्रिस्क वॉकिंग (Brisk Walking) आणि योगासनांचा समावेश करावा. गरोदर असलेल्या सर्वच स्त्रिया व्यायाम करू शकत नाहीत. ज्यांना काही वैद्यकीय कारणांमुळे आराम करण्याचा सल्ला दिला असेल त्यांनी व्यायाम करू नये. अ‍ॅनिमिया, हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या, उच्च रक्तदाब असणाऱ्या, गर्भाशयाचं तोंड नाळेनं बंद झाल्याची समस्या (placenta Previa) ज्यांना असेल त्यांनी सल्ल्याशिवाय व्यायाम करू नये. तसंच गरोदरपणात वारंवार ब्लिडिंग होण्याची तक्रार उद्भवत असेल, तरी व्यायाम करण्याआधी सल्ला घ्यावा. इतर स्त्रिया गरोदरपणात नक्कीच नियमित व्यायाम करू शकतात. मात्र ओटिपोटावर ताण येणार नाही किंवा दुखापत होणार नाही असेच व्यायाम करणं जरूरीचं असतं. गरोदरपणात व्यायाम करताना त्याचा अतिरेक होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. जास्त दमणूक झाली, तर उष्णता वाढते व त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. हलका व्यायाम करणं सुरक्षित आणि फायदेशीर असतं. सुरुवात करण्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम असतो. यामुळे एरोबिक कंडिशनमध्ये व्यायाम तर होतोच पण सांध्यांवर ताण येत नाही. कमी वजन घेऊन करता येतील असे ताकद वाढवणारे व्यायाम, स्ट्रेचिंग, योगासनं, पेल्विक फ्लोर मसल ट्रेनिंग असे व्यायाम गरोदरपणात करता येतात. काही सोप्या गोष्टी - व्यायामाचा अतिरेक करू नका. आठवड्याला 150 मिनिटांचं लक्ष्य ठेवा. - भरपूर पाणी प्या. लिक्विड पदार्थ भरपूर घ्या. - मोकळे व सैल कपडे घाला. - व्यायामाआधी वॉर्म अप करा. हृदयाचे ठोके 150 पेक्षा कमी राहतील याकडे लक्ष द्या. - एकावेळी 60 मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करू नका. गरोदरपणात टाळावे असे व्यायामप्रकार - 10 मिनिटांपेक्षा जास्त पाठीवर झोपून व्यायाम करू नका - खूप जास्त दमछाक होईल असे व्यायाम करू नका - जास्त वेटलिफ्टिंग असलेला व्यायाम करू नका - जास्त उंचावर असलेल्या ठिकाणी व्यायाम करणं टाळा - एकमेकांचा स्पर्श होईल, असे खेळ खेळू नका व्यायाम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करतो. व्यायामाच्या साह्यानं गरोदरपणातील समस्या तर दूर होतातच, शिवाय प्रसुतीनंतरच्या शारीरिक बदलांसाठीही शरीर व मन तंदुरुस्त राहतं. निराशा, ताण या गरोदरपणात सामान्यपणे जाणवणाऱ्या मानसिक समस्या कमी होण्यास व्यायामानं मदत होते. त्यामुळे नियमित व्यायामाला गरोदरपणातही आपल्या सवयीचं केलं पाहिजे.
First published:

Tags: Pregnancy, Pregnant, Yoga day

पुढील बातम्या