तुमची उंची कमी आहे का? मग उंच दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

तुमची उंची कमी आहे का? मग उंच दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही आकर्षक आणि स्टायलिश दिसू शकता.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : आपण इतरांपेक्षा थोडं वेगळं आणि हटके दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. माणसांच्या प्रचंड गर्दीत स्वतःचं वेगळेपण जपण्यासाठी लोक काय काय करतात. नव्या स्टाइलचे ड्रेस, एक्सेसरीज, शूज, बॅग हे सर्वच इतरांहून वेगळं असावं याकडे आजकाल सर्वांचा कल असतो. त्यामुळे आज प्रत्येकजण त्याच्या स्टाइल आणि ड्रेसिंगबाबत खूप जागरूक असतो. काही जण त्यांच्या उंची बाबत सुरुवातीपासूनच जागरुक असतात. तर काहींना मात्र कमी उंचीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकदा स्टाइलच्या बाबतीत कमी उंचीच्या मुलींना समस्या येतात. पण काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची उंची जास्त असल्याचा भास निर्माण करू शकता आणि यामुळे तुम्ही आकर्षक आणि स्टायलिश दिसता.

सावधान ! सॅनेटायझरचा अतिवापर केल्यानं होऊ शकतात ‘हे’ आजार

शॉर्ट ड्रेस घालणं टाळा- सध्या सर्वांनाच शॉर्ट ड्रेसचं आकार्षण असतं. पण कमी उंचीच्या मुलींनी असे ड्रेस घातल्यास त्यांची उंची अजूनच आखूड वाटते. त्यामुळे शक्यतो शॉर्ट ड्रेस घालणं कमी उंचीच्या मुलींनी टाळावं.

लॉन्ग ट्राउझर घाला- कमी उंचीच्या मुलींनी लॉन्ग ट्राउझर घातल्यास त्यांची उंची जास्त भासते. यामुळे तुमचं व्यक्तीमत्व आकर्षक दिसतं.

लेग्गड पॅन्ट घालणं टाळा- उंच मुलींना लेग्गड पॅन्ट हा खूप चांगला आणि आकर्षक पर्याय असतो. मात्र कमी उंचीच्या मुलींवर मात्र या पॅन्ट चांगल्या दिसत नाहीत.

निमयित एक सफरचंद खा, 'हे' गंभीर आजार दूर ठेवा

साइड बॅगची योग्य निवड- साइड बॅगची निवड तुमच्या उंचीनुसार करा. जास्त लांबीची किंवा ओव्हर साइझ बॅग तुमच्या सौंदर्यात बाधा आणते.

हे प्रिंट वापरणं टाळा- कमी उंचीच्या मुलींनी आडव्या स्ट्राइप प्रिंटचे शर्ट किंवा टॉप घालणं टाळावं. अशाप्रकारच्या कपड्यांमुळे तुमची उंची आणखी कमी वाटते.

या प्रिंट्सना करा इन- कमी उंचीच्या मुलींनी उभ्या स्ट्राइप प्रिंटचे ड्रेस किंवा टॉप घालायला वापरायला हव्यात. यामुळे तुमची हाइट जास्त वाटते.

मोठ्या प्रिंटचे ड्रेस टाळा- कमी उंचीच्या मुलींनी मोठ्या प्रिंटचे ड्रेस घालणं शक्यतो टाळावं. तसेच इतर कोणाताही ड्रेस घालताना तो प्लेन कलरमध्ये असतील याची काळजी घ्या.

रात्री आंबट पदार्थ खात असाल तर सावधान; 'हे' आहेत दुष्परिणाम

First published: July 13, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading