Home /News /lifestyle /

भारतात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांची संख्या पाहून धक्काच बसेल, लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

भारतात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांची संख्या पाहून धक्काच बसेल, लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

भारतीयांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा (National Family Health Survey) ताजा अहवाल खूप चर्चेत आहे. या सर्वेक्षणात नागरिकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते.

    नवी दिल्ली, 16 मे : भारतीयांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा (National Family Health Survey) ताजा अहवाल खूप चर्चेत आहे. या सर्वेक्षणात नागरिकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये लग्नापूर्वी किती जणांनी सेक्स केला आहे किंवा त्यांनी त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणासोबत कधीही शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले आहेत का, यासह अनेक प्रश्नांचा समावेश होता. या रिपोर्टमध्ये भारतीयांचं लग्नाचं वय आणि पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचं भिन्न असल्याचंही आढळून आलं आहे. आकडेवारीवरून असंही दिसून आलं आहे, की अनेक पुरुषांनी लग्नापूर्वी सेक्स केला होता. परंतु सर्व समुदायांमध्ये या संदर्भातलं निरीक्षण वेगळं असल्याचं दिसून आलं आहे. या अहवालातल्या निरीक्षणांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. त्या संदर्भातलं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. किती भारतीय लग्नाआधी सेक्स करतात? सर्वच समुदायांत विवाहपूर्व लैंगिक संबंधातलं पुरुषांचं प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त आहे. सर्वेक्षणात सरासरी 7.4 टक्के पुरुष आणि 1.5 टक्के महिलांनी लग्नाआधी सेक्स केल्याचं मान्य केलं. सर्वेक्षणात सुमारे 12% शीख पुरुषांनी लग्नापूर्वी सेक्स केल्याचं सांगितलं. हा आकडा सर्व धार्मिक समुदायांमध्ये सर्वाधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत शीख महिलांमध्ये हा आकडा केवळ 0.5% असून तो सर्वांत कमी आहे. म्हणजेच शीख पुरुष पहिल्या क्रमांकावर तर महिला शेवटच्या क्रमांकावर आहेत. हिंदू पुरुषांमध्ये ही संख्या 7.9 टक्के, मुस्लिम पुरुषांमध्ये 5.4 टक्के, ख्रिश्चन पुरुषांमध्ये 5.9 टक्के आहे. हिंदू महिलांमध्ये 1.5 टक्का, मुस्लिम महिलांपैकी 1.4 टक्के, तर 1.5 टक्का ख्रिश्चन महिलांनी लग्नापूर्वी सेक्स केल्याचं मान्य केलं. दरम्यान, सेक्सचा आर्थिक परिस्थितीशी संबंध असल्याचं पाहायला मिळालं. श्रीमंत पुरुष आणि गरीब स्त्रियांमध्ये विवाहापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्याचं प्रमाण जास्त दिसून आलं. विवाहित पार्टनरशिवाय दुसऱ्यांशी सेक्स करण्याचं प्रमाण किती? दुसऱ्या व्यक्तीशी विवाहबाह्य (Extra Martial Affair) शारीरिक संबंध ठेवण्याबाबत स्त्री-पुरुष दोघांचाही दृष्टिकोन सारखाच असल्याचं आढळून आलं. स्त्रिया ही बाब उघडपणे फारशा कबूल करत नाहीत. सध्या महिलांचे सरासरी सेक्शुअल पार्टनर 1.7 टक्के आहेत, तर पुरुषांचे 2.1 आहे. 2006 मध्ये झालेल्या NFHS च्या तिसऱ्या सर्वेक्षणात हे प्रमाण महिलांमध्ये 1.02 आणि पुरुषांमध्ये 1.49 टक्के एवढं होतं. बायकोला सेक्स करण्यास नकार देण्याचा अधिकार आहे का? वैवाहिक जीवनातले लैंगिक संबंध हे पूर्णपणे पुरुषप्रधान समाजाशी जोडलेले आहेत. पत्नीने सेक्सला नकार देणं योग्य असल्याचं सर्वेक्षणात 87 टक्के महिला आणि 83 टक्के पुरुषांनी सांगितलं. परंतु राज्यानिहाय ही आकडेवारी बदलते. अरुणाचल प्रदेशात तब्बल 30 टक्के महिलांनी सांगितलं, की पतीला सेक्सची इच्छा असताना पत्नीने नकार देणं योग्य नाही.
    First published:

    Tags: Sexual health

    पुढील बातम्या