मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी घेतलेला शॉर्टकट ठरला घातक; 'या' औषधाने गेला तरुणाचा जीव

वजन कमी करण्यासाठी घेतलेला शॉर्टकट ठरला घातक; 'या' औषधाने गेला तरुणाचा जीव

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

चारचौघांमध्ये आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसावं म्हणून अनेक तरुण शरीरयष्टी कमावण्याच्या मागे लागलेले असतात. स्थूल असलेल्या व्यक्ती बऱ्याचदा व्यायाम न करता औषधांचा उपयोग करून वजन घटवण्याचा प्रयत्न करतात. असाच शॉर्टकट अवलंबणं एका युवकाच्या जीवावर बेतलं आहे.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई, 7 जानेवारी-  चारचौघांमध्ये आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसावं म्हणून अनेक तरुण शरीरयष्टी कमावण्याच्या मागे लागलेले असतात. स्थूल असलेल्या व्यक्ती बऱ्याचदा व्यायाम न करता औषधांचा उपयोग करून वजन घटवण्याचा प्रयत्न करतात. असाच शॉर्टकट अवलंबणं एका युवकाच्या जीवावर बेतलं आहे. त्याने सेवन केलेल्या औषधामुळे तरुणाला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि अखेर मृत्युशी त्याची झुंज अपयशी ठरली. ‘टीव्ही नाईन हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

  स्थुल असल्यामुळे तमिळनाडूतील श्रीपेंरबुदुरजवळ सोमंगलम येथील रहिवासी असलेल्या सूर्याची मित्रांनी थट्टा केली. हा प्रकार सूर्याच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि व्यायाम सोडून त्याने दोन आठवडे औषधांचं सेवन करणं सुरू केलं. त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं; पण अखेर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सूर्याप्रमाणे अनेक असे युवक आहेत, जे वजन कमी करण्यासाठी औषधं सेवन करत असतात. परंतु, त्याचा गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतो. अनेकदा व्यंगही येऊ शकतं.

  (हे वाचा: ट्रेडमिलमधल्या तांत्रिक त्रुटी लपवणं पडलं महागात; `या` कंपनीला 154 कोटी रुपयांचा दंड)

  या औषधामुळे तरुणाचा झाला घात

  वजन कमी करण्यासाठी सूर्या या तरुणाने हायड्रॉक्सिल हे औषध घेतलं होतं. हायड्रॉक्सिल हे एक अॅसिड आहे. वजन घटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधात याचा वापर केला जातो. हे औषध घेतल्यानंतर व्यक्तीला भूक लागत नाही. शरीरातील कॅलरी अधिक जाळून ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेटचा उपयोग करत फॅट कमी करण्याचं काम हायड्रोक्सिलद्वारे केलं जातं. यात गार्शिना, उलाँग आणि पांढऱ्या चहाचं मिश्रण असतं. शरीरातील मेटॅबॉलिझम यामुळे वाढतं. झपाट्याने वजन कमी होत असल्याने बहुतांश जण याकडे वळतात. वजन घटवणाऱ्या टॅब्लेट किंवा पावडरच्या रूपामध्ये ते सहज मिळतं.

  लिव्हर निकामी करतं हे औषध

  वजन घटवणाऱ्या औषधांचा शरीरावर मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. टीओआयच्या एका रिपोर्टमध्ये डॉ. मानसी चतरथ म्हणाल्या की, अशा प्रकारच्या औषधांचं सेवन केल्यास लिव्हरवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कंपन्या यात हर्बल घटक असल्याचा दावा करतात, परंतु त्याच्या टॅब्लेट खाल्ल्याने त्यांचा दुष्परिणाम अधिक दिसून येतो. अनेकदा लिव्हर निकामी होतं. आतापर्यंत अशी 23 प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासनाने या औषधांचा वापर करण्याआधी सावधगिरी बाळण्याचा इशाराही दिला आहे.

  या औषधांचे दुष्परिणाम काय?

  वजन घटवण्यासाठी शॉर्टकट अवलंबून अशा प्रकारची औषधे घेतली जात असतील तर लिव्हर निकामी होण्यासह इतरही आजार जडू शकतात. अनेक प्रकरणात अस्वस्थता आणि चिंता वाढत असल्याचेही समोर आले आहे. डॉ. पूनम पाहुजा दुनेजा म्हणाल्या की, या औषधांमुळे झोप कमी होते आणि महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या वाढू शकते. या औषधांमुळे शरीराचे तापमानही वाढत राहते.

  मिलियन डॉलरची आहे उलाढाल

  वजन घटवण्यासाठी औषधांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शरीराला हे औषध अपायकारक असले तरी असंख्य लोक याची खरेदी करतात. मिलियन डॉलरमध्ये या इंडस्ट्रीची उलाढाल आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायामाचा मार्ग सोडून शॉर्टकट अवलंबत या औषधांचे सेवन केले जाते. कुठल्याही मेडिकलवर याचे टॅबलेट सहज मिळतात. डॉक्टरांच्या सल्ल्याविना याचे सेवन केले जाते आणि दुष्परिणाम भोगावे लागतात.

  First published:

  Tags: Lifestyle, Weight loss