मुंबई, 05 मार्च: शिल्पा शेट्टीची फिगर पाहून तिचा डाएट प्लॅन काय आहे, असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पाने आपल्या Instagram वर एक पोस्ट केली होती. यात चायनीज आणि इटालियन पदार्थांपैकी ती अधिक कशाला पसंती देते हे तिनं आपल्या चाहत्यांना सांगिलतल होतं.
आपण बाहेर कितीही खालं तरी देखिल घरचं जेवणाला अधिक पसंती दिली जाते. बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ चटपटीत पदार्थ यापेक्षा ही जास्त घरच्या वरण भातावर ताव मारणारे अनेक जण आहेत. घरचं जेवण हे शरीरासाठी अतिशय फायद्याचं असत.
शिल्पा शेट्टी ही आपल्या डाइट प्लॅनवर अधिक लक्ष देत असते. शिल्पानं यासंबंधित एका व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे. इंडियन फूड हे केवळ तयार करण्यसाठीचं सोपं नसतं तर ते स्वादिष्ट असत. शिल्पा शेट्टी देखिल गेल्या काही दिवसांपासून अशा स्वादिष्ट खाण्याची वाट पाहत होती. तिनं सोशल मीडियावर घरगुती जेवणाची पोस्ट शेयर केली आहे.
बॉलिवुड अभिनेत्री आपल्या किचनमध्ये भारतीय पदार्थ बनवून ते सोशल मीडियावर शेयर करताना पाहायला मिळतात. शिल्पा शेट्टीनं देखिल आपल्या इन्टाग्रामवर घरगुती जेवणाचा फोटो शेअर केला आहे. ‘#lunchtime। #greatIndiandiet’ अस कॅप्शन तिनं या फोटोला दिल आहे. शिल्पा शेट्टी ही आपल्या डाएटला घेवून अधिक सिरीअस असते. त्यामुळे तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये हे पदार्थ कमी तेलातील असणार यात शंकाचं नाही.
शिल्पा शेट्टीनं याआधी भारतीय मिठाई खातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती रसगुल्ले खाताना पाहायला मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.