स्ट्रेस फ्री होण्यासाठी शिल्पा शेट्टी वापरते HOMEMADE SCRUB; शेअर केला व्हिडीओ

स्ट्रेस फ्री होण्यासाठी शिल्पा शेट्टी वापरते HOMEMADE SCRUB; शेअर केला व्हिडीओ

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा स्क्रब उपयुक्त आहे, असं शिल्पा शेट्टीने (shilpa shetty) सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 15 जून : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) आपल्या चाहत्यांना योगा आणि कुकिंगचे धडे तर देतच असते. आता तिनं ब्युटी केअर टीप्सही शेअर केल्यात. शिल्पाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सॉल्ट स्क्रब (salt scrub) बनवण्याची पद्धत शेअर केली आहे. विशेष म्हणजे हा स्क्रब तिने आपला मुलगा विहानसह बनवला आहे.

शिल्पा आपल्या मुलालाही कुकिंग, योगा शिकवत असते, आता तिनं त्याला स्किन केअरसाठी सॉल्ट स्क्रब कसा बनवायचा हेदेखील शिकवलं आहे.

 

View this post on Instagram

 

This is for all those bored children and Moms who need innovative ideas to keeps their kids occupied 😅(I know that feeling) It works better when there is a creative and useful end result. Viaan wanted to try out a homemade ‘Mojito Salt Scrub’, or as I prefer calling it, the ‘Lemon Mint Salt Scrub’😆😆 It is as simple to make as the name suggests. All you need: • 1 cup of powdered rock/Epsom salt • 1/4cup of almond/coconut oil, • 5/8 crushed mint leaves, • 1/2 tsp of lemon zest, & • just a dash of lemon juice - and voila! Just remember to preserve it in an airtight container, away from any kind of moisture. This scrub can effectively help kids and grown ups relax, and drains out all kinds of negativity from the body when you soak your feet in water mixed with the scrub. Do try it out! . . . . . #DIY #SaltScrub #QuarantineTime #MotherSon #SwasthRahoMastRaho #StayHomeStaySafe

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

सॉल्ट स्क्रब बनवण्यासाठी लागणारी सामग्री

1 कप बारीक केलेलं रॉक सॉल्ट (Rock Salt)

1/4 बदाम तेल किंवा खोबरेल तेल

6-7 पुदीन्याची पाने

1/2 चमचा लेमन जेस्ट (लिंबूची किसलेली साल)

लिंबाचा रस

कसं बनवायचं सॉल्ट स्क्रब?

रॉक सॉल्टमध्ये बदाम तेल मिसळा. त्यानंतर क्रश केलेली पुदिन्याची पाने, लेमन जेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून एका हवाबंद डब्यात ठेवून द्या. यामध्ये पाणी टाकायचं नाही.

कसं वापराल सॉल्ट स्क्रब?

जेव्हा तुम्हाला स्ट्रेस आल्यासारखं वाटेल तेव्हा एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात हा स्क्रब टाका आणि या पाण्यात पाय ठेवून बसा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा स्क्रब उपयुक्त आहे. यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल, शरीरातील सर्व नेगेटिव्हिटी दूर होते, असं शिल्पाने सांगितलं.

हे वाचा - अरेच्चा! हात न टेकवता PUSH UPS; कतरिनाने हे केलं तरी कसं? पाहा व्हिडीओ

सॉल्ट स्क्रब पाय आणि शरीराच्या इतर भागांसाठी ठिक आहे, मात्र चेहऱ्यावर लावू नये. तसंच याचा वापर जास्त करू नये नाहीतर स्किन बर्न होऊ शकते. त्यामुळे मर्यादित प्रमाणातच याचा वापर करावा.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - वर्क फ्रॉम होममुळे पती आपल्याकडे लक्ष देईना; पत्नीने शोधून काढली भन्नाट आयडिया

First published: June 15, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या