कमबॅकसाठी शिल्पा शेट्टीने वापरला व्यायामाचा अनोखा प्रकार, तुम्हीही करू शकता असा व्यायाम

कमबॅकसाठी शिल्पा शेट्टीने वापरला व्यायामाचा अनोखा प्रकार, तुम्हीही करू शकता असा व्यायाम

पिलेट्स या व्यायाम प्रकाराचा जास्तीत जास्त फायदा हा लवचिकता, स्नायू बळकट करण्यासाठी, श्वासासाठी होतो.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. वयाच्या 44 व्या वर्षीही ती इतकी फिट कशी काय असू शकते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो. ती एवढी फिट का आहे याचच उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शिल्पा शेट्टी जवळपास 13 वर्षांनी निकम्मा सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. तिने 2007 मध्ये अपने या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. मोठ्या पडद्यापासून जरी ती दूर झाली असली तरी छोट्या पडद्यावर रिअलिटी शोच्या माध्यमातून नेहमीच तिचा वावर असायचा.

आता 13 वर्षांनी सिनेमात काम करायचं म्हणजे त्याची तयारीही मजबूतच करावी लागणार यात काही शंका नाही. सब्बीर खआन दिग्दर्शित या सिनेमात अभिमन्यु दसानी आणि शिर्ले सेतिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दरम्यान, स्वतःला फिट आणि ग्लॅमरस ठेवण्यासाठी शिल्पा सध्या पिलेट्स हा व्यायामाचा नवा प्रकार करत आहे. नुकतेच तिने पिलेट्स क्लास जॉइन केले आहेत. क्लासचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओला आतापर्यंत 3.60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पिलेट्स या व्यायाम प्रकाराचा जास्तीत जास्त फायदा हा लवचिकता, स्नायू बळकट करण्यासाठी, श्वासासाठी होतो. टोन बॉडीसाठी सध्या हा व्यायाम प्रकार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. फक्त शिल्पाच नाही तर नोरा फतेही, वाणी कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसारखे अनेक सेलिब्रिटी हा व्यायाम प्रकार करताना दिसत आहेत.

शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून ती कौटुंबिक फोटोंसोबतच तिच्या व्यायामाचे आणि फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती कुटूंबासोबत थायलंडला सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. यावेळी तिने वॉटर थेरपी घेतानाचाही एक व्हिडिओ शेअर केला.

 

View this post on Instagram

 

Today was an incredible feeling .. An Honest confession.. “I can’t swim” . I’ve tried so many times to learn, trust me.. but in vain.. So I’m not a water-baby ,but today I felt like a baby in a mother’s womb.. Had to share this with you.. the smile on my face is proof of the bliss I felt to just be able to #float .. for the first time ( with someone’s help ofcourse and no fear) is unparalleled.. To just let go ..of our fears , and trust is what we find hardest.. Lovvved this #watsutherapy an absolute #musttry ♥️ @shawellness #shawellnessclinic #stretching #watertherapy #gratitude #happy #keepafloat #joy #letgo #littlejoys #learningnewthings #traveldiaries #spain

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘आजचा दिवस फार सुंदर होता. मला पोहता येत नाही. मी अनेकदा शिकण्याचा प्रयत्न केला पण कधी शिकू शकले नाही. पण आज मला कळलं की आईच्या पोटात मुलाला कसं वाटत असेल. माझ्या चेहऱ्यावरील हसू सारं काही सांगत आहे.’ शिल्पा स्विमिंग पूलमध्ये एकटी नसून तिच्यासोबत ट्रेनरही होता. हाच ट्रेनर तिला वॉटर थेरपी देत होता. शिल्पाने ही थेरपी सर्वात जास्त एन्जॉय केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

शेविंग करताना पुरुष हमखास करतात या चुका, वेळीच सावध व्हा नाहीतर...

कम बॅकसाठी सानिया मिर्झा तयार, अवघ्या काही महिन्यांत कमी केलं 26 किलो वजन

अरे बापरे! या 10 देशांमध्ये विकलं जातं सर्वात जास्त प्लॅस्टिक

Published by: Madhura Nerurkar
First published: August 2, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading