• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • विआनला रस्त्यावर आणलं आणि... शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रानं मुलाला शिकवला आयुष्याचा धडा; पाहा VIDEO

विआनला रस्त्यावर आणलं आणि... शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रानं मुलाला शिकवला आयुष्याचा धडा; पाहा VIDEO

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) नवरा राज कुंद्रानं (raj kundra) मुलगा विआनला (viaan) सोबत घेऊन जे काही केलं आहे, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जानेवारी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि राज कुंद्रा (raj kundra) ही जोडी सोशल मीडियावर (social media) लोकप्रिय आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दोघं नवरा-बायको आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. मजेशीर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय आपलं वैयक्तिक आयुष्यही सर्वांसोबत शेअर करतात. असाच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्यांचा मुलगा विआनला (viaan) आयुष्याचा धडा देतो आहे. शिल्पा शेट्टी आपल्या मुलासोबत खूप व्हिडीओ शेअर करत असते. आपल्या मुलाला काही ना काही ती शिकवत असते. सोशल मीडियावर त्याचे असे बरेच व्हिडीओ आहेत. आता राज कुंद्रानंही विआनसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपला मुलगा विआनला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देतो आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

  व्हिडीओत पाहू शकता राज कुंद्रा विआनला घेऊन रस्त्यावर आला आहे आणि रस्त्यावरील गरीबांना मदत करत आहेत. रस्त्यावर फिरत तो गरीबांना ब्लँकेट्सचं वाटप करत आहे. हे वाचा - DDLJ-मराठा मंदिर हे समीकरण आजही ठरतंय Houseful,कोरोना काळातही प्रेक्षकांची गर्दी राज कुंद्रानं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, 'एक दिवस एक चांगलं काम. आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. आपण गोष्टी हलक्या पद्धतीने घेऊ शकत नाही.' शिवाय या व्हिडीओत राज कुंद्रा सांगतो सकाळी सहा वाजता मुलासह गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यासाठी घराबाहेर पडत आहे. डोक्यावर छत, ताटात जेवण आणि झोपण्यासाठी चांगली गादी सहज उपलब्ध होत नसे, हे मुलांना शिकवणं आवश्यक आहे. हे वाचा - विकी कौशलबरोबरच्या नात्याबाबत स्वत: कतरिनाने केला खुलासा? आपल्या मुलांना श्रीमंतीचा गर्व होऊ नये, आपल्याकडे जे काही आहे त्याचं महत्त्वं समजावं त्याची त्यांना कदर असावी. तसंच आपल्याकडे भरभरून असल्यानं इतरांनी छोटीशी का होईना मदत करावी, मदतीचा हात पुढे करावा. हाच धडा राजनं विआनला दिला आहे.  या व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. त्याची ही पोस्ट म्हणजे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
  Published by:Priya Lad
  First published: