मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Shilpa Shetty Fitness Routine : फिटनेससाठी या गोष्टींची काळजी घेते शिल्पा, पाहा काय आहे शिल्पाचा फिटनेस मंत्र

Shilpa Shetty Fitness Routine : फिटनेससाठी या गोष्टींची काळजी घेते शिल्पा, पाहा काय आहे शिल्पाचा फिटनेस मंत्र

शिल्पा स्वतःला फूड लव्हर म्हणून सांगते हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. शिल्पा शेट्टी माइंडफुल इटिंग करते, म्हणजेच ती खूप जपून जेवण करते.

शिल्पा स्वतःला फूड लव्हर म्हणून सांगते हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. शिल्पा शेट्टी माइंडफुल इटिंग करते, म्हणजेच ती खूप जपून जेवण करते.

शिल्पा स्वतःला फूड लव्हर म्हणून सांगते हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. शिल्पा शेट्टी माइंडफुल इटिंग करते, म्हणजेच ती खूप जपून जेवण करते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 6 सप्टेंबर : फिटनेस फ्रीक बॉलिवूडच्या सौंदर्यवतींबद्दल बोलायचे झाले तर त्या यादीत शिल्पा शेट्टीचे नाव नक्कीच येते. शिल्पा स्वतःला फूड लव्हर म्हणून सांगते हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. शिल्पा शेट्टी माइंडफुल इटिंग करते, म्हणजेच ती खूप जपून जेवण करते. ती किती कॅलरीज घेतेय आणि ती पचवायला काय करतेय या सगळ्याचा हिशेब ती ठेवते. कोणते पोषणद्रव्ये कोणत्या प्रमाणात घ्यायची हे तिला चांगलेच माहीत आहे. यासोबतच ती रोज योगाही करते.

बी-टाऊनमधील अनेक सुंदरी त्यांच्या वाढत्या वयात आणखी सुंदर दिसू लागल्या आहेत. आपल्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देणे हे याचे एक मोठे कारण आहे. अनेकांना वाटतं की अभिनेत्री स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जास्त डाएटिंग करतात. पण ते तसे नाही. जर आपण फिटनेस फ्रिक बॉलिवूड गर्ल्सबद्दल बोललो तर त्या यादीत शिल्पा शेट्टीचे नाव नक्कीच येते.

वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चालणं! पण दररोज किती वेळ, किती पावलं चालावं?

काय आहे शिल्पाचे फिटनेस मंत्र

- शिल्पा तिची फिगर राखण्यासाठी रोज व्यायाम करते. यासोबतच ती तिच्या जेवणाचीही विशेष काळजी घेते. नियमित जीवनशैली आणि आहारामुळे सौंदर्य टिकून राहते, असे तिचे मत आहे.

- अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान अनेकदा योग्य खाणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासात सुका मेवा, काजू किंवा घरी बनवलेला ग्रॅनोला सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याशी तडजोड करावी लागणार नाही.

- शिल्पा शेट्टी टीव्ही पाहताना स्नॅक्स वगैरे खाणे टाळते. तिचा असा विश्वास आहे की या काळात टीव्हीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खात असतात. आपल्या मुलांनाही शिल्पाने या सवयीपासून दूर ठेवले आहे.

- शिल्पाच्या म्हणण्यानुसार, नेहमी लहान भांड्यांमध्ये जेवण सर्व्ह करा. याचे कारण असे की तुम्ही एका लहान भांड्यात एकाच वेळी जास्त अन्न घेऊ शकत नाही. असे केल्याने तुम्ही जास्त खाणे टाळाल.

- शिल्पाच्या मते, अन्न पूर्णपणे चघळल्याने कॅलरी 12% कमी होऊ शकते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, अन्न खाणे म्हणजे फक्त हेल्दी फूड खाणे किंवा कमी प्रमाणात अन्न खाणे असा नाही. तुम्ही कधी, काय आणि कसे खात आहात हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रत्येक घास जितका चांगला चावता तितके ते पचणे सोपे होते. याशिवाय अन्न नीट चावल्याने पोट आणि आतड्यात रक्ताभिसरण वाढते.

Coffee for Weight Loss : खरंच! 'ही' कॉफी प्यायल्यानं होतं वजन कमी? घ्या जाणून

- शिल्पाचे मात्र आहे की, आपण जेवण करताना त्या अन्नाविषयी कृतज्ञ असले पाहिजे. अन्न कोणतेही असो तुम्ही ते आनंदाने खाल्ले पाहिजे आणि त्याचा आस्वाद घेतला पाहिजे.

- आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिल्पा केवळ खाण्यापिण्याची काळजी घेत नाही तर नियमित योगा आणि व्यायामही करते.

First published:

Tags: Digital prime time, Fitness, Health Tips, Lifestyle, Shilpa shetty