Home /News /lifestyle /

Alert! Coronavirus नंतर आता Shigella Bacteria चा कहर; 58 रुग्ण, एकाचा मृत्यू

Alert! Coronavirus नंतर आता Shigella Bacteria चा कहर; 58 रुग्ण, एकाचा मृत्यू

केरळात 58 लोक आजारी पडले. त्यांना अन्न विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात असताना रुग्णांच्या नमुन्यात शिगेला बॅक्टेरिया सापडले आहेत.

    तिरुवनंतपुरम, 04 मे : देशात कोरोनाव्हायरस थैमान घालतोच आहे, अशात आता बॅक्टेरियानेही कहर केला आहे. देशात शिगेला बॅक्टेरियाची प्रकरणं समोर आली आहे (Shigella Bacteria Outbreak). शिगेला बॅक्टेरियाची लागण झालेले 58 रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ज्या केरळमध्ये भारतातील कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं, तिथंच शिगेला बॅक्टेरियाचेही रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे (Kerala Food posioning). कासरगोड जिल्ह्यात  58 लोक आजारी पडले. या सर्वांनी रविवारी एका रेस्टॉरंटमध्ये श्वरमा खालला होता. त्यानंतर त्यांना अन्नविषबाधा झाली आणि त्याचं कारण शिगेला बॅक्टेरिया असल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार जिल्ह्यातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्या पदार्थामुळे विषबाधा होण्याचं कारण शिगेला बॅक्टेरिया असल्याचं सांगितलं जातं आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात फूड पॉयझनिंग झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या आणि मलाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांपैकी पाच रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते, त्यापैकी तीन रिपोर्टमध्ये शिगेला बॅक्टेरियाचं संक्रमण असल्याचं सिद्ध झालं आहे. हे वाचा - 100 वर्षांचे सुपरफास्ट आजोबा! अवघ्या 26.34 सेकंदात पार केलं 100 मी. अंतर; वर्ल्ड रेकॉर्डही मोडला त्यामुळे याला बॅक्टेरियाचा उद्रेक मानलं जात आहे. बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी सामान्य नागरिक आणि अन्नपदार्थ विक्रेत्यांना याबाबत जागरूक करत आहेत. या आजारापासून कसा बचाव करता येईल याचे उपाय सांगितले जात आहेत. दूषित अन्नपाण्यामार्फत हे बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे अन्नपदार्थ, पाणी स्वच्छ असणं गरजेचं आहे. आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांची आणि पाण्याचीही तपासणी केली जात आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Kerala, Lifestyle

    पुढील बातम्या