लाइफस्टाइल

  • associate partner

बॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ

बॉलिवूडप्रमाणे IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज; अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ

बॉलिवूडमधील (bollywood) अनेक सेलिब्रिटी NCB च्या रडारवर आहेत. आता एका अभिनेत्री IPL मधील ड्रग्जबाबतही मोठा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास करता करता याप्रकरणी आरोप असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं (rhea chakraborty) ड्रग्ज कनेक्शन (Drugs) समोर आलं आणि मग हळूहळू बॉलिवूडमधीलच ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली, ज्यांचा ड्रग्जची संबंध आहे. त्यानंतर टीव्ही कलाकारांचीही नावं उघड झाली आणि आता या सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशीही सुरू आहे. त्याता आता आयपीएलमध्येही (IPL) ड्रग्जचा वापर होत असल्याचा खळबळजनक दावा एका अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने  (Sherlyn Chopra) आयपीएलमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे दावा केला आहे. कोरोनाकाता नाइट रायडर्स  (Kolkata Knight Riders)  च्या मॅचनंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी वॉशरूममध्ये कोकिन घ्यायच्या. मला एनसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं, तर मी ही सविस्तर खुलासा करणार असल्याचंही शर्लिन म्हणाली.

एबीपीशी बोलताना शर्लिन म्हणाली, "केकेआरची मॅच पाहण्यासाठी मी कोलकात्याला गेली होती. मॅचनंतर पार्टी ठेवण्यात आली होती. त्या पार्टीतदेखील मी गेले होते. पार्टीत क्रिकेटर्स आणि बॉलिवूडचे बडे कलाकारही होते. मी डान्स करून करून खूप थकले होते. म्हणून फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले. तिथं गेल्यानंतर मी जे पाहिलं ते पाहून हैराण झाले. प्रत्येक जण कोकिन घेत होता"

हे वाचा - ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची उद्या चौकशी; गुन्हा सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

शर्लिनने आयपीएलच्या कोणत्या सिझनमध्ये हे तिनं पाहिलं हे सांगितलेलं नाही. आयपीएलचे सामने तिसऱ्यांदा भारताबाहेर खेळवले जात आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत आयपीएल झाली होती आणि आता दुसऱ्यांदा यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आलं आहे. शर्लिन चोप्राने हा जो दावा केला आहे, त्याची न्यूज 18 पुष्टी देत नाही.

हे वाचा - 'दीपिका ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली, NCBला आणखी नावे देण्यात तयार'

एनसीबीने रिया चक्रवर्ती (rhea chakraborty), ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. आता अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्यासह फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचीही चौकशी केली जाते आहे. दीपिकाची 25 सप्टेंबर तर सारा आणि श्रद्धाची 26 सप्टेंबरला चौकशी होणार आहे.

Published by: Priya Lad
First published: September 24, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading