Love Story : प्रेमभंग झालेल्या शेन वाॅटसनला या टीव्ही प्रेझेंटरच्या रूपात मिळालं खरं प्रेम

Love Story : प्रेमभंग झालेल्या शेन वाॅटसनला या टीव्ही प्रेझेंटरच्या रूपात मिळालं खरं प्रेम

2006चा तो काळ. प्रेमभंग झालेले ते दोघे भेटले. आॅस्ट्रेलियात ते आपापल्या क्षेत्रात लोकप्रिय होते. पण समदुःखी होते.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : 2006चा तो काळ. प्रेमात धोका खाल्लेले दोघं भेटले. आॅस्ट्रेलियात ते लोकप्रिय होते. पण त्यांचं हृदय तुटलं होतं. दोघंही जोडीदाराच्या शोधात होते. त्यांना असा जोडीदार हवा होता जो त्यांच्यासाठीच बनला असेल. हे दोघं होते आॅस्ट्रेलियाचा महागडा क्रिकेटपटू शेन वाॅटसन आणि प्रसिद्ध स्पोर्टस टीव्ही प्रेझेंटर ली फर्लांग.

वाॅटसन हा तेव्हा आॅस्ट्रेलियन क्रिकेटचा वंडर बाॅय होता. त्याच्या बॅटिंगचा झंझावात होता. पण त्याचा तेव्हा प्रेमभंग झाला होता. त्याच्या प्रेमिकेनं त्याला सोडून दुसऱ्याचा हात पकडला होता. सहा फुट उंचीच्या वाॅटसनचा खास मित्र होता ब्रेट ली. ब्रेट लीची बायको लिजनं वाॅटसनची ओळख टीव्ही प्रेझेंटर लीशी करून दिली.

लीच्या जवळ प्रत्येकाला यायचं होतं

फक्त खेळाचे चाहते नाही, तर खेळाडूंनाही लीच्या जवळ यायची इच्छा होती. ती फाॅक्स स्पोर्टस चॅनलवर फुटबाॅलवर लोकप्रिय शो सादर करायची. स्पोर्टस् इव्हेंट कव्हर करायची. खेळाडूंसोबत उठणं-बसणं तिच्यासाठी सर्वसामान्य होतं. प्रसिद्ध खेळाडूही लीच्या जवळ यायचं कारण शोधत असायचे.

दोघांचाही झाला होता प्रेमभंग

जेव्हा ब्रेट लीनं ली फर्लांग आणि वाॅटसनची भेट घडवून आणली होती. वाॅटसनची होणारी बायको किम मंगेतर त्याला सोडून गेली होती. तिचं आॅस्ट्रेलीयन टीव्ही प्रेझेंटरबरोबर अफेअर सुरू झालं होतं. इकडे लीचंही रग्बी खेळाडू बेग राॅससोबतचं नातं तुटलं होतं.

पहिल्या भेटीनंतर रोमान्स

पहिल्या भेटीनंतर ली आणि बाॅटसननं एक महिन्यानंतर डेटिंग सुरू केलं. काही महिन्यांनंतर त्यांना जाणवलं की ते दोघं एकमेकांसाठीच बनलेत.

हो, आम्ही प्रेम करतोय

2006च्या शेवटच्या महिन्यात वाॅटसननं आपलं रिलेशनशिप जगजाहीर केलं. दोघांची जोडीही लोकप्रिय झाली. ली सर्वात ग्लॅमरस जोडीदार ठरली.

त्यानंतर झालं शुभमंगल

दोघांनी 2010मध्ये लग्न करायचा निर्णय घेतला. आॅस्ट्रेलियात ते गोल्डन कपल म्हणून ओळखलं जायला लागलं. काहींनी शतकातली लव्ह स्टोरीही म्हटलं.


घरी दोन चिमुकल्यांचं आगमन

लग्नानंतर लीनं संसाराला वाहून दिलं. दोघांना आधी मुलगा आणि नंतर लगेचंच मुलगी झाली. त्यादिवसात लीनं टीव्हीवरचं काम सोडलं होतं. वाॅटसननंही लग्नानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा ठोकला. आता तो फक्त टी-20 लीग खेळतोय. इतर आॅस्ट्रेलीयन खेळाडूंपेक्षा जास्त पैसे कमावतोय. ली पुन्हा टीव्हीवर परतलीय.

शेनला फिट ठेवते ली

वाॅटसन 36 वर्षांचा तर ली 32ची. वाॅटसन आयपीएल खेळतो. त्यावेळी ली त्याच्या सोबत येते. लीनं आॅस्ट्रेलियात मुलांसाठी शाळा सुरू केलीय.भारतात आल्यावर ली दोन शब्द हिंदी बोलू शकते.

-संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: love story
First Published: Mar 19, 2019 08:01 PM IST

ताज्या बातम्या