मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शनीची साडेसाती, अडीचकीमुळे त्रस्त आहात? नवरात्रीत `या` दिवशी पूजाविधी केल्यास समस्या होतील दूर

शनीची साडेसाती, अडीचकीमुळे त्रस्त आहात? नवरात्रीत `या` दिवशी पूजाविधी केल्यास समस्या होतील दूर

Shani sadesati

Shani sadesati

सध्या काही राशींना साडेसातीतील ढैय्या म्हणजे अडीचकीचा त्रास सुरू आहे. या कालावधीत समस्या, चिंता जाणवत असतील तर काही उपाययोजना केल्यास शनीची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 सप्टेंबर :साडेसाती हा शब्द जरी ऐकला तरी लोकांची भीतीने गाळण उडते. कारण शनीची साडेसाती जीवनात दुःख, कष्ट निर्माण करणारी असते, असा समज लोकांमध्ये आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाला कर्म आणि न्यायाची देवता मानलं जातं. सध्या काही राशींना साडेसातीतील ढैय्या म्हणजे अडीचकीचा त्रास सुरू आहे. या कालावधीत समस्या, चिंता जाणवत असतील तर काही उपाययोजना केल्यास शनीची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते. कुंडलीत शनी अशुभ असेल तर जीवनात काही संकेत मिळत असतात. असे काही संकेत दिसत असतील तर खास पूजाविधी केल्यास अडचणी, त्रासांतून मुक्ती मिळू शकते, असं ज्योतिषाचे अभ्यासक सांगतात. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या कालावधीत काही उपाय केल्यास शनीदेवाची कृपादृष्टी निश्चितपणे प्राप्त होईल. `एबीपी लाईव्ह`ने या विषयीची माहिती दिली आहे.

प्रत्येकाला जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो. शनीची साडेसाती किंवा अडीचकी सुरू असेल तर संबंधित व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. सध्या मिथुन आणि तुळ राशीला शनीची अडीचकी सुरु आहे. धनु, मकर आणि कुंभ राशीला साडेसाती सुरु आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रीतील मंगळवारी आणि शनिवारी विशेष पूजाविधी केल्यास या राशींच्या लोकांना शनीची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते. नवरात्रीदरम्यान 1 ऑक्टोबरला शनिवार तर 4 ऑक्टोबरला मंगळवार आहे. या दिवशी तुम्ही पूजाविधी करू शकता.

हेही वाचा - Money Mantra : ऑनलाईन शॉपिंग टाळा; आज या राशीला आर्थिक तोटा, हातच्या संधी जाण्याची शक्यता

जेव्हा कुंडलीतील शनी अशुभ असतो. तेव्हा जीवनात अनेकप्रकारे त्रास होऊ शकतो. बॅंक बॅलन्स कमी होणं, कर्ज कमी होण्याऐवजी वाढणं, लव्ह रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होणं, विवाह लांबणं, अनावश्यक प्रवास करावा लागणं, अज्ञात गोष्टींविषयी भीती वाटणं, एखाद्या आजाराचं उशिरा निदान होणं, कौटुंबिक जीवनात वाद आणि तणाव वाढणं, कामांमध्ये सातत्यानं व्यत्यय येणं, एका ठिकाणी फार काळ न राहणं, नोकरीत अचानक समस्या निर्माण होणं या समस्या शनी अशुभ असेल तर जाणवतात. पण त्यानी घाबरून जाण्याची गरज नाही कारण त्यावर उपाय आहेत.

श्री हनुमानाच्या भक्तांना शनी त्रासदायक ठरत नाही, असं सांगितलं जातं. ``मी तुझ्या भक्तांना त्रास देणार नाही,`` असं वचन शनिदेवानं श्री हनुमानाला दिल्याचा उल्लेख पौराणिक कथेत आहे. त्यामुळे शनिची पीडा जाणवत असेल तर श्री हनुमानाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. श्री हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव शांत होतात, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे नवरात्रीचा कालावधी शनी आणि श्री हनुमानाच्या उपासनेसाठी उत्तम मानला जातो. नवरात्रीतील शनिवारी आणि मंगळवारी सायंकाळी ब्रह्मचारिणी देवीची आरती करणं, दुर्गादेवीची पूजा करणं, शनिशी संबंधित वस्तू दान देणं, हनुमान चालिसा पठण करणं, श्री हनुमानास कापड अर्पण करणं, शनिमंत्राचा जप करणं आणि क्रोध, अहंकाराचा त्याग करणं हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपादृष्टी प्राप्त होऊन जीवनातल्या समस्या दूर होऊ शकतात, असं जाणकारांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Lifestyle, Rashibhavishya