मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शनिच्या अवकृपाने संकटं लागतील मागे; चुकूनही करू नका ही कामं; 5 राशीच्या लोकांनी रहावं सावध

शनिच्या अवकृपाने संकटं लागतील मागे; चुकूनही करू नका ही कामं; 5 राशीच्या लोकांनी रहावं सावध

शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात.

शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी साडेसाती सुरु असलेल्या राशींनी आषाढ महिन्या ‘हे’ उपाय करावेत.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली,24 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 12 महत्त्वाच्या राशी (Zodiac Sing) आहेत. राशीनुसार (Zodiac Sing) त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावानुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. पण काही राशींवर शनि (Shani) ग्रहाचा जास्त प्रभाव असतो शनिदेवांची कृपा असेल तर, माणूस यशस्वी होतो .त्यामुळे शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी (Special Grace of Shani Dev) अनेक लोक विविध उपाय करत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनिला अतिशय प्रभावी ग्रह मानलं गेलं आहे. 9 ग्रहांपैकी शनिच्या अवकृपेचे दुष्परिणाम सगळ्याच राशींना भोगावे लागतात.

ज्योतिष शास्त्रानुसार शनिला न्याय करणारा देव मानला गेलेला आहे. व्यक्ती आयुष्यामध्ये जे चांगलं वाईट कर्म करतो त्याची फळं प्रदान करण्याचं काम शनिदेव करत असतात. त्यामुळेच शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी कधीही चुकीची कामं करू नका.

(पावसळ्यात वाढत्या वजनाची चिंता नको; आहार नियंत्रित करणाऱ्या ’या’ आहेत जबरदस्त Ti)

शनिची पनवती

शनिदेव महादशा, अंतर्दशा, साडेसाती आणि पनवती या काळामध्ये व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. सध्याच्या काळात मिथुन आणि तूळ राशीवर शनिची पनवती सुरू आहे तर, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांची साडेसाती सुरू आहे. म्हणूनच शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी या 5 राशींनी जास्त काळजी घ्यायला हवी.

(हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अ‍ॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे)

आषाढ महिन्यात करा पूजा

आषाढ महिना देखील धार्मिक कार्यांसाठी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आषाढ महिन्यातल्या कोणत्याही शनिवारी पुजा करण्याने शनिदेवाचे अशुभ परिणाम कमी होतात. त्यामुळे शानिवारी पुजा नक्की करा.

(या शहरात राहतात फक्त 138 लोक; मेयरने दिली जॉब आणि फुकट घराची ऑफर)

उपाय

शनिदेवांना शांत करण्यासाठी काही चुकीची कामं मुळीच करू नयेत.

कमजोर माणसांना त्रास देऊ नका.

कोणालाही फसवू नका.

दुसऱ्याची संपत्ती फसवून बळकावू नका.

व्यसनांपासून दूर रहा.

चुकीची संगत नको.

कष्ट करणाऱ्यांचा अपमान करू नका.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark