थंड पाणी तुम्हाला दीर्घ श्वास घेण्यास भाग पाडते, ज्यामुळे शरीरातील CO2 पातळी कमी होते, यामुळे एकाग्र होण्यास देखील मदत होते. मेघाने सांगितले की, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते. इतर फायदे सांगताना ती म्हणाली की, शरीरातील ब्राउन फॅटसारखी फॅटी सेल्स बॉडी हीट निर्माण करते. त्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते. (फोटो क्रेडिट्स: Instagram @meghaguptaofficial) हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का? अभिनेत्रीने या विषयी सांगितले असले तरी, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करताना काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. अचानक थंड पाणी अंगावर पडल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. या कारणास्तव, काही आरोग्य तज्ज्ञ कोमट पाण्याने आंघोळ करणे सर्वोत्तम मानतात. तरीही तुम्हाला थंड शॉवर घ्यायचा वाटत असल्यास, प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Winter, Winter session