चर्चा तर होणारच! शाहरुखच्या लेकीने घातलेल्या एका ड्रेसची किंमत सव्वा दोन लाख, पाहा फोटो

चर्चा तर होणारच! शाहरुखच्या लेकीने घातलेल्या एका ड्रेसची किंमत सव्वा दोन लाख, पाहा फोटो

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) ची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) विविध कारणांसाठी नेहमी चर्चेत असते. यावेळी तिच्या एका पार्टीतील ड्रेसची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : अभिनेत्री आणि महागडे ड्रेस हे समीकरण काही नवं नाही. पण अभिनेते आणि अभिनेत्रींप्रमाणेच त्यांची मुलंही या बाबतीत मागे नाहीत. अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) विविध कारणांसाठी नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड फोटोमुळे तर कधी तिच्या ट्रिप्स मुळे. यावेळी तिच्या एका जुन्या पार्टीतील ड्रेसची चर्चा आहे. आईबाबांप्रमाणेच सुहाना ही अतिशय स्टायलिश आहे. तिला नेहमीच वेगवेगळ्या पार्टीज मध्ये तर कधी मित्रमैत्रिणीसोबत स्पॉट केलं जातं. (suhana khan expensive dress)

सुहानाच्या एका पार्टीतील ड्रेसची चर्चा रंगली आहे. सुहानाने काळ्या रंगाचा तसेच गोल्डन डिझाइन असलेला एक ड्रेस परिधान केला होता. एका महागड्या ब्रँडचा हा ड्रेस असून त्यावर स्टायलिश सँडल्स तिने घातले होते. या ब्रँडच्या वेबसाइटवर या ड्रेसची किंमत 2917 डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपायंमध्ये त्याची किमंत जवळपास 2.17 लाख रुपये इतकी आहे.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहाना आता फक्त वीस वर्षांची आहे. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सुहानाचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. सुहानाला अगदी तिच्या किशोर वयापासूनच ग्लॅमरस लुक (glamorous looks) आवडतात. त्यामुळे वेगवेगळ्या पार्टीज मध्ये ती वेगळ्या आणि स्पेशल लूुक मध्ये दिसून येते.

'मी सन्मान करतो पण...', सिद्धार्थ शुक्लाने दाखवून दिली विद्युत जामवालची मोठी चूक

सुहाना ही तिच्या सोशल मीडियावर (active on social media) फारच सक्रिय असते. तिचे सोशल मीडिया वर लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. तर लकरच ती चित्रपटात दिसणार असल्याच्याही चर्चा आहेत. सुहानाने एका शॉर्ट फिल्म मध्येही काम केलं आहे. याखेरीज ती तिच्या देशी तसेच विदेशी मित्रमैत्रिणींसोबत नेहमीच ट्रिप्स करत असते. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सुहानाने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर होणाऱ्या वाईट कमेंट्स वर भाष्य केलं होतं. त्यानंतर ती फारच चर्चेत आली होती.

Published by: News Digital
First published: April 9, 2021, 11:49 PM IST

ताज्या बातम्या