Home /News /lifestyle /

Sexual Wellness : जोडीदारासमोर हस्तमैथुन केल्यानं काय होतं?

Sexual Wellness : जोडीदारासमोर हस्तमैथुन केल्यानं काय होतं?

तुमच्या मनातील अशाच काही प्रश्नांची सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टने दिलेली उत्तरं...

प्रश्न :  जोडीदारासमोर हस्तमैथुन (Masturbation) केलं तर काय होतं? उत्तर :  काहींना त्यांच्या समोर हस्तमैथुन केलं तर खूपच विचित्र वाटतं तर काहींना ते कामुक वाटतं. तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनावर हे सर्वस्वी अवलंबून आहे. बरेच जण संभोग क्रियेमध्ये हस्तमैथुनाला स्थान देतात आणि त्यामुळे त्यांना संभोग (Sex) खूपच इंटरेस्टिंग आणि कामोत्तेजना उद्दिपित करणारा वाटतो. तुमच्या मनाचा लहरीपणा म्हणून तुम्ही बीडीएसएम प्रकारचा संभोग करताना जोडीदाराला तुमच्यासमोर हस्तमैथुन करायला सांगू शकता किंवा जोडीदाराला हस्तमैथुन करताना बघितल्याचा बनाव करून सुरुवात करू शकता. बरेचदा जोडीदाराला हस्तमैथुन करताना पाहिल्यानंतर त्याला कुठल्या पद्धतीचा स्पर्श आवडतो आणि त्यातून त्याला कामानंद मिळतो हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. हे वाचा - Sexual Wellness: पॉर्न पाहून हस्तमैथुन करण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल का? छोट्या घरांत (Small houses) राहणाऱ्या जोडप्यांना जोडीदारासमोरच हस्तमैथुन करणं भाग असतं. एखाद्यानं हस्तमैथुन केलं म्हणजे त्याचा संभोग अपुरा राहिला असं समजण्याचं कारण नाही. बरेचदा तुमच्या जोडीदाराला संभोगाची इच्छा नसते आणि तुम्ही बहरात आलेले असता अशावेळी हस्तमैथुन करून भावनांना वाट मोकळी करून देणं कधीही सर्वोत्तम. त्यामुळे हस्तमैथुन केल्याबद्दल तुम्ही किंवा तुमच्या जोडीदारानं लाज वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. हे वाचा - Sexual Wellness: 'सेक्ससाठी पत्नी उत्सुक नसते; माझी लैंगिक इच्छा पूर्ण कशी करू?' दुसरीकडे अनेकांना दुसरी व्यक्ती हस्तमैथुन करताना खूप विचित्र वाटतं किंवा त्या खोलीतही थांबू नये असं वाटतं. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटतं आणि त्यांच्या खासगी स्पेसमध्ये कुणीतरी घुसल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशा भावनांचा आदर करणं ही तुमची जबाबदारी आहे.
Published by:Priya Lad
First published:

पुढील बातम्या