Home /News /lifestyle /

Sexual Wellness : सर्वांसमोर नग्नावस्थेत राहणं; Nudity योग्य आहे का?

Sexual Wellness : सर्वांसमोर नग्नावस्थेत राहणं; Nudity योग्य आहे का?

अनेकांना Nudity म्हणजे सामान्य वाटतं. पण त्यांना तशा अवस्थेत पाहणाऱ्या प्रत्येकाला ते मान्य असतंच असं नाही.

प्रश्न : माझी आई फ्रेंच आणि वडील भारतीय आहेत. फ्रान्समध्ये असताना ती न्यूड बिचेसवर कुटुंबीयांबरोबर जात असे. त्यामुळे न्यूडिटी अर्थात नग्नता तिच्यासाठी सामान्य असून बाथरूममधून ती विना कपड्यांची देखील बाहेर येते. वडील देखील विशिष्ट मर्यादेपर्यंत तिला सपोर्ट करतात. दुसऱ्यांना न्युडिटीमुळे काही त्रास होत नसेल तर न्यूडिटी योग्य आहे का? उत्तर : कुटुंबातील इतर व्यक्तींना यावर आक्षेप नसल्यास न्यूडीटी (Nudity) अतिशय योग्य आहे. बऱ्याच वेळा नग्नतेला लैंगिक, अपमानास्पद, अनैतिक म्हणून पाहिलं जातं. पण तुमच्या घरात न्यूड (Nudity) राहत असाल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना यामुळे काही अडचण नसेल तर हे अगदी योग्य आहे. परंतु न्यूडिटी इतरांना दर्शवण्यासाठी केली जाऊ नये. यासाठी विशेष काळजी आणि समतोल राखायला हवा. समाजामध्ये कपडे घालून वागणं म्हणजे केवळ स्वतःचे आजारापासून, हवामान बदलापासून आणि इतर अनेक गोष्टींपासून सरंक्षण करणं इतकंच नाही. तर तो आपल्या गोपनीयता आणि इतरांच्या गोपनीयतेच्या शारीरिक सीमा निश्चित करण्याचा आणि मार्ग दाखवण्याचा देखील एक प्रकार आहे. यामध्ये याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. याचबरोबर प्रत्येकाची वैचारिक पद्धत वेगळी आहे. तुम्ही तुमच्या आईला बाथरूममधून बाहेर येताना बाथरूम गाऊन वापरायला सांगू शकता किंवा तिच्या रूममध्ये ती यासाठी विशिष्ट वेळ निवडू शकते. यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी न्यूडिटीची व्याख्या वेगळी आहे. एखाद्यासाठी ते लैंगिक असू शकते किंवा नैसर्गिक असू शकते. यामुळे प्रत्येकाच्या विचारांवर ती गोष्ट अवलंबून आहे. हे वाचा - Sexual Wellness : Bisexual असल्यास लग्न करणं योग्य आहे का? जर तुमच्या आईसाठी न्यूडिटी (Nudity) ही केवळ नैसर्गिक आहे आणि वडिलांना देखील त्यापासून काहीही त्रास नाही तर तुम्ही देखील त्याकडे सकारात्मक पद्धतीने आणि आई वडिलांप्रमाणेच पाहायला हवं. पण जर तुम्हाला हे आवडत नसेल तर तुम्ही त्यांना शांतपणे त्यांचा आदर ठेवून त्यांच्या रूममध्ये हा न्यूडिटी वेळ घालवण्यास सांगू शकता.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या