प्रश्न : बायसेक्शुअल व्यक्तीने लग्न करणं योग्य आहे का?
उत्तर : समाजात बायसेक्शुअल (Bisexual) समूहाचा एक घटक नेहमीच राहणार आहे. सध्या समाजामध्ये त्यांना ओळख आणि मान्यता मिळत आहे. असं असतानाही लैंगिक आणि रोमँटिक संबंधांसाठी इतरांपेक्षा अधिक पर्याय असल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पार्टनरकडून संशय आणि अविश्वास वाढतो आहे. या अविश्वासामुळे बायसेक्शुअल व्यक्तीच्या चारित्र्याकडे संशयाने पाहिलं जातं. पण हा प्रश्न निष्ठेचा नसून नैतिकतेचा आहे.
बायसेक्शुअल (Bisexual) व्यक्तीने लग्न करणं अगदी योग्य आहे. जोपर्यंत ते आपल्या जोडीदाराशी वचनबद्ध राहण्यास तयार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करण्यास सक्षम आहेत तोपर्यंत लग्न करणं योग्य आहे. असे अनेकजण आहेत, जे स्वतः queer नाहीत पण ते या समुदायाला पाठिंबा देतात. असं असलं तरी बायसेक्शुअल (Bisexual) व्यक्तीशी लग्न करण्यात ते कम्फर्टेबल नाहीत. हा समाजातील एक गंभीर पूर्वग्रह आहे जो या व्यक्तींवर दडपण आणण्यासाठी वापरता कामा नये.
हे वाचा - पहिलं किस केल्यानंतर तो माझ्या मेसेजलाही रिप्लाय देत नाही, मी त्याला आवडत नाही?
यामुळे भारतातील एलजीबीटीक्यूआय (LGBTQI) समुदाय समलिंगी लग्नासाठी दबाव आणत असेल तर एखाद्याला त्याच्या अधिकारापासून डावलण्यासारखं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.