प्रश्न : माझ्या 7 वर्षाच्या मुलानं मला एकदा सॅनिटरी नॅपकिनच्या (sanitary napkin) जाहिरातींबद्दल विचारलं. त्याला त्याबद्दल कसं सांगावं, हे मला कळत नव्हतं, त्यामुळं मी त्याला सांगितलं की, जेव्हा मुलींना टॉयलेटमध्ये जायचं असतं आणि त्यांना फार वेळ थांबणं शक्य नसतं तेव्हा त्या असं सॅनिटरी नॅपकिन वापरतात. तेव्हापासून त्यानं सॅनिटरी नॅपकिन्सला ममा डायपर म्हणण्यास सुरुवात केली. मी त्याला त्यावेळी योग्य माहिती दिली नाही, याबद्दल मला अपराधी वाटतं आहे.
उत्तर : आपल्या मुलांना प्रामाणिक आणि स्पष्ट थेट उत्तर देणं नेहमीच चांगलं असतं, तरीही काही वेळा असे काही प्रश्न मुलांनी विचारल्यास काही न सुचल्यानं त्या वेळी योग्य वाटेल असे उत्तर देणं ही सामान्य बाब आहे. खरं तर आता तुम्ही मुलाला त्या वेळी आपण योग्य उत्तर न देता चूक केल्याचं सांगितलंत तरी ते अजिबात वावगं होणार नाही. उलट मुलाला हा संदेश मिळेल की, पालकही माणसंच असून तेही चुकू शकतात. चूक कबूल करून ती सुधारता येते, नवीन गोष्ट शिकता येते हेही त्याला कळेल. त्याला हा धडा देण्याची ही अगदी योग्य संधी आहे. तुम्ही लगेच आपली चूक मान्य करून ती दुरुस्त करण्याचा विचार करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे.
हे वाचा - फिल्ममधील 'ते' सिन पाहून लहान मुलांना पडलेल्या प्रश्नांना काय द्यावीत उत्तरं?
आता मूळ प्रश्नाकडे वळू या. लहान मुलाला मासिक पाळीबाबत कसं सांगायचं? तुमचा मुलगा सात वर्षाचा आहे. तो मासिक पाळीबाबत मूलभूत गोष्टी जाणून घेण्यासाठी पुरेसा मोठा आहे. फक्त या वयातील मुलांना आपली योनी, लिंग आदी मूलभूत शरीररचनेबद्दल माहिती असल्याची खात्री करणं आवश्यक आहे.
मासिक पाळीबाबत सांगताना आपण असे सांगू शकता, ‘जेव्हा मुली सुमारे 12-13 वर्षांच्या होतात तेव्हा त्यांच्या शरीरात बरेच बदल घडतात. हे बदल त्यांच्या शरीरातील रसायनांमुळे ज्यांना आपण हार्मोन्स म्हणतो, त्यामुळे होतात. हे बदल घडतात तेव्हा महिलेचं शरीर बाळासाठी सज्ज होतं. जसं कुणी पाहुणे येणार असतील तर आई घर आवरून नीटनेटकं, छान ठेवते, तसंच शरीरही तयार होत असतं. जेव्हा बाळ येत नाही तेव्हा शरीरात तयार झालेली अतिरिक्त जागा आणि कुशन्स नैसर्गिकरित्या काढल्या जातात, त्यावेळी थोडं रक्त बाहेर टाकलं जातं. हे रक्त बाहेर पडतं ते कोणती दुखापत किंवा जखम झाल्यानं नाही, तर शरीरानं तयार केलेल्या अतिरिक्त गोष्टी बाहेर काढून टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा तो एक भाग असतो.'
हे वाचा - Sexual Wellness : मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?
एकदा मासिक पाळीबाबत मूलभूत गोष्टी समजल्यावर मुलाला तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्सबाबत सविस्तर माहिती देऊ शकता. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स वापरून कशी स्वच्छता राखली जाते हे तुम्ही सांगू शकता. सॅनिटरी नॅपकिनचा नमुना आणि पाण्याचा वापर करून ते कसे कार्य करतंहे देखील मुलाला समजावू शकता. मुलं मोठी होताना त्यांना मासिक पाळीबद्दल नीट माहिती असल्यानं ती याबाबतीत मोकळेपणानं वागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual wellness