Home /News /lifestyle /

जाहिरातीत दाखवलं जाणारं Pregnancy kit म्हणजे काय हे मुलांना कसं सांगावं?

जाहिरातीत दाखवलं जाणारं Pregnancy kit म्हणजे काय हे मुलांना कसं सांगावं?

अशा जाहिराती पाहिल्यानंतर मुलांना बरेच प्रश्न पडतात. पण लहान म्हणून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य ती उत्तरं कशी द्यावीत याबाबत Sexual wellness तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

प्रश्न : टीव्हीवर जाहिरात पाहत असताना माझ्या 8 वर्षीय मुलीने मला प्रेग्नन्सी किट काय असतं हे विचारलं यावर तिला काय उत्तर देऊ हे मला समजत नाही. उत्तर : साधारणपणे प्रेग्नन्सी किट (pregnancy kit) हे महिला गर्भवती आहे की नाही हे तपासण्यासाठी केला जातो. लहान मुलांना यासंबंधी अधिक सोपेपणाने समजून सांगण्यासाठी त्यांच्या शालेय परीक्षेचं उदाहरण देऊ शकता. ज्या पद्धतीनं तुम्ही तिसऱ्या वर्गातून चौथ्या वर्गात जाण्यासाठी पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी परीक्षा घेतली जातं. त्याच पद्धतीने महिलेच्या पोटात लहान मुलाची वाढ होत महिलेच्या पोटात नैसर्गिक पद्धतीने केमिकल तयार होत आहेत की नाही याची चाचणी या प्रेग्नन्सी किटमधून करण्यात येते. खरं तर पालक म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देणं खूप अवघड गोष्ट आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना बाहेरून, ऑनलाईन पद्धतीनं चुकीची माहिती मिळण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक, योग्य आणि चांगली माहिती देणं उपयोगी ठरेल. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तुमच्यासाठी थोडं अवघड जात असेल तर त्यांना याबद्दल काय माहित आहे असं विचारा. तुम्हाला काय वाटतं? हे असं का घडत असेल याबद्दल तुला काय वाटतं? असे प्रश्न विचारा. या काही मार्गांनी तुम्ही तुमच्या मुलांबरोबर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. हे वाचा - 'Sanitary Pad म्हणजे काय?' जाहिरात पाहणाऱ्या लहान मुलांना आता काय सांगावं? या अशा विषयांबद्दल तुमच्या मुलांच्या मनात चुकीचे विचार तयार होण्यापेक्षा न घाबरता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. यामुळे ते चुकीच्या मार्गाने या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न न करता तुमच्या मदतीने योग्य ज्ञान मिळवू शकतात.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या