मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बाळ पोटात कसं जातं आणि बाहेर कसं येतं; चिमुरड्यांच्या अशा प्रश्नाला काय उत्तर द्यावं?

बाळ पोटात कसं जातं आणि बाहेर कसं येतं; चिमुरड्यांच्या अशा प्रश्नाला काय उत्तर द्यावं?

फोटो सौजन्य - canva

फोटो सौजन्य - canva

तुम्हीदेखील दुसऱ्यांदा प्रेग्नंट असाल आणि तुमच्या पहिल्या मुलानं किंवा मुलीनं तुम्हाला असा प्रश्न विचारल्यावर त्यांना नेमकं काय आणि कसं उत्तर द्यावं या पेचात तुम्हीदेखील पडला आहात का?

प्रश्न : मी लवकरच माझ्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या 5 वर्षीय मुलाने मला लहान मुलं आईच्या पोटात कशी जातात आणि ती बाहेर कशी येतात हा प्रश्न विचारला. त्याच्या या प्रश्नाने मी निरुत्तर झाले. याबाबतीत थोडं मार्गदर्शन करा.

उत्तर : या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर हे विचारणारं मूल किती वर्षांचं आहे यावर अवलंबून आहे. यामध्ये मूल समजेल अशा वयाचं असेल तर तुम्ही त्याच्या प्रश्नाचे या पद्धतीने उत्तर देऊ शकता. आई आणि वडिलांकडे प्रत्येकी एक बीज (Seed) असतं. वडिलांचं बीज आईच्या शरीरात गेल्यानंतर तिच्या बीजाबरोबर याचा संपर्क होतो. यामुळे मुलं जन्माला येतात. याचबरोबर वडिलांच्या लिंगामधून (Penis) हे बीज आईच्या पोटात जातं. पुढे ही दोन्ही बीजं एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं रूपांतर हळूहळू मानवी शरीरामध्ये होतं असे त्याला समजवू शकता. यासाठी त्याला ज्या पद्धतीने बीचे रूपांतर झाडामध्ये होते त्याचे देखील उदाहरण देऊ शकता. याचबरोबर मूल पोटातून बाहेर कसं येतं हे समजावून सांगण्यासाठी हे मूल आईच्या पोटात वाढल्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने आईच्या पोटातून बाहेर येत असल्याचं त्याला सांगू शकता.  6 ते 7 वर्षे वय असलेलं मूल थोड्याफार प्रमाणात या गोष्टी समजू शकतो. यामुळे तुम्ही या गोष्टी त्याला सांगू शकता.

हे वाचा - 'Sanitary Pad म्हणजे काय?' जाहिरात पाहणाऱ्या लहान मुलांना आता काय सांगावं?

यानंतर मुलं वयात आल्यानंतर तुम्ही त्याला बीज आणि वीर्याचा संबंध सांगू शकता. यामध्ये लैंगिक क्रियेद्वारे कशा पद्धतीनं हे बीज स्त्रीच्या पोटात जातं हे त्याला सांगू शकता. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे याविषयी चर्चा करताना लैंगिक संबंध हे  केवळ विवाहित जोडप्यांमध्ये किंवा केवळ पुनरुत्पादनाच्या उद्देशानं घडणारी गोष्ट नाही हे लक्षात ठेवा. लहान मुलाचा जन्म कसा होतो किंवा गर्भधारणा कशी होते याचं उत्तर देताना हे लक्षात ठेवा की, तुमच्यासाठी जी लैंगिक क्रिया आहे ती तुमच्या मुलाच्या प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर आहे.

हे वाचा - फिल्ममधील 'ते' सिन पाहून लहान मुलांना पडलेल्या प्रश्नांना काय द्यावीत उत्तरं?

यामुळे तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरं द्याल, तुमच्या मुलाला देखील तितकंच बरं वाटेल. न लाजता, अगदी सोप्या भाषेत,  थेट आणि निर्विकारपणे या प्रश्नांची उत्तरे द्या.

First published:

Tags: Sexual wellness