Kiss केल्यानं ती प्रेग्नंट कशी झाली? फिल्म पाहून लहान मुलांना पडलेल्या प्रश्नांना काय द्यावीत उत्तरं

Kiss केल्यानं ती प्रेग्नंट कशी झाली? फिल्म पाहून लहान मुलांना पडलेल्या प्रश्नांना काय द्यावीत उत्तरं

फिल्ममध्ये असे सीन पाहिल्यानंतर तुमच्या मुलांनीही तुम्हाला कधी ना कधी असे प्रश्न विचारले असतील. त्यावेळी लहान म्हणून तुम्ही एकतर त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता किंवा त्याची उत्तरं देणं टाळता, त्यांना गप्प करता. पण असं कधीच करू नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

  • Share this:

प्रश्न : माझा 6 वर्षाचा मुलगा आमच्याबरोबर टीव्हीवर फिल्म पाहत असताना अभिनेत्याने अभिनेत्रीला किस केल्यानंतर ती गर्भवती कशी राहते असा प्रश्न विचारला. याचबरोबर मी तिला किस केल्यानंतर ती देखील गर्भवती होईल का असंही त्यानं मला विचारलं.

उत्तर : भारतीय पालकांना आपल्या मुलांनी विचारलेल्या लैंगिकसंबंधित प्रश्नांची (sexuality related questions) उत्तरं देणं खूपच अवघड असतं. अगदी एखादा भयपट पाहत आहोत की काय अशी भावना भारतीय पालकांची होते. पण आपल्या मुलांनी विचारलेल्या अशा प्रश्नांची उत्तरं देताना घाबरण्याची गरज नाही किंवा ते विचित्रदेखील वाटायला नको. यामागे मुख्य कारण म्हणजे प्रौढ होताना आपल्याला लैंगिक संबंध हे अश्लील आहेत असं शिकवलं जातं. यामुळे आपल्या पाल्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे. दहा वर्षांच्या मुलांनी असे प्रश्न विचारले तर त्याबद्दल चिंता व्यक्त करू नका किंवा आश्चर्य देखील वाटून घेऊ नका. त्यांच्यासाठी लैंगिकतेशी संबंधित प्रश्न ही त्यांच्या कुतूहलाची अभिव्यक्ती आहे, त्यांच्या शरीराबद्दल आणि आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी पाहत आहेत त्याबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे.

हे वाचा - Sexual Wellness : मला Anal Sex हवंय पण पत्नी तयार नाही, तिचं मन कसं बदलू?

तुमच्या मुलांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे तुमच्याकडे त्याला केवळ गर्भवती (Pregnancy) कसे होते हे समजून सांगण्याची संधी नाही तर टीव्हीवर दाखवण्यात येणारं सगळं सत्य नसतं हे समजून सांगण्याची देखील संधी आहे. केवळ किस केल्यानं गर्भवती (Pregnancy) होत नाही, तर टीव्हीवर खऱ्या आयुष्यातील काही दृश्यं दाखवत नसल्याचंदेखील सांगू शकता. यावेळी टीव्हीवर जाहिरात किंवा कट मारत असल्याचं तुम्ही त्याला समजावून सांगू शकता. टीव्हीत दाखवण्यात येणारं सर्व खरंच असतं असं नाही हे त्यांना सांगा. यासाठी तुम्ही त्याला बाथरूमला जाण्याचं उदाहरण देऊन हे पटवू शकता. आपण खऱ्या आयुष्यात लघवीला आणि बाथरूमला जातो पण टीव्हीवर हे दाखवत नाही असं त्त्याला सांगा. यामुळे टीव्हीवरील व्यक्ती जे दाखवतात ते नेहमीच खरं असतं असं नाही याची माहिती त्याला देऊ शकता.

हे वाचा - Sexual Wellness : मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?

गर्भवती (Pregnancy) होण्याच्या प्रश्नावर तुम्ही त्याला सर्व काही खरं सांगू शकता. गर्भवती होण्यासाठी पुरुष आणि स्त्रीच्या शरीराची पूर्ण वाढ होणं आवश्यक आहे.  मुलाला जन्म देण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोन्हीही महत्त्वाचे आहेत. स्त्रीच्या पोटात मुलाची वाढ होते, ही सर्व माहिती त्यांना द्या.

Published by: Priya Lad
First published: January 14, 2021, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading