Home /News /lifestyle /

पुरुष सतत सेक्सबाबतच विचार करत असतात का? तज्ज्ञ काय म्हणाले पाहा

पुरुष सतत सेक्सबाबतच विचार करत असतात का? तज्ज्ञ काय म्हणाले पाहा

सेक्सदरम्यान नवऱ्याचा हत्येचा प्लॅन

सेक्सदरम्यान नवऱ्याचा हत्येचा प्लॅन

सेक्सबाबत फार बोललं जात नसल्याने, त्याबाबत फारशी माहिती घेतली जात नसल्याने याबाबत अनेक गैरसमज आहेत.

मुंबई, 21 मे : सेक्स (Sex) हा स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा विषय असतो. मात्र त्याबद्दल उघडपणे बोलणं मात्र संकोचामुळे टाळलं जातं. या विषयाबद्दल कुतूहल अगदी प्रत्येकालाच असतं. मात्र त्याबद्दल उघडपणे तज्ज्ञांना शंका विचारणारी, या बाबतीत वैद्यकीय सल्ला घेणारी मंडळी मोजकीअसतात. अनेक मंडळी काही तरी समस्या आल्यावरच या विषयातल्या डॉक्टरांकडे जातात. काही जण तर समस्या आल्यानंतरही डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. या पार्श्वभूमीवर लैंगिक शिक्षण (Sex Education) हाच या विषयातल्या समस्या सोडवण्यासाठी चांगला उपाय असल्याचं या विषयातले तज्ज्ञ वेळोवेळी सांगत असतात. सेक्सबाबत फार बोललं जात नसल्याने, त्याबाबत फारशी माहिती घेतली जात नसल्याने याबाबत अनेक गैरसमज आहेत. सेक्स एक्सपर्ट (Sex Expert) ट्रेसी कॉक्स (Tracey Cox) यांनी असेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. डेली मेलवर त्यांनी सेक्ससंबंधी अशाच काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पुरुषांचं वीर्यस्खलन (Ejaculation) झाल्याशिवाय त्यांना ऑरगॅझम (Orgasm) अनुभवता येत नाही. ऑरगॅझम आणि वीर्यस्खलन या गोष्टी सारख्याच आहेत, असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही प्रक्रिया वेगळ्या आहेत. वीर्यस्खलनाची प्रक्रिया प्रोस्टेट आणि युरेथ्रामध्ये घडते. स्नायू आकुंचन पावून वीर्य शरीराबाहेर फेकतात. ऑरगॅझम मात्र मेंदूत घडतो. पुरुषांच्या मेंदूचं स्कॅनिंग केलं तर ऑरगॅझमची प्रतिमा एखाद्या इलेक्ट्रिकल वादळासारखी दिसते. ऑरगॅझमची क्रिया वीर्यस्खलनाच्या 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'पासून सुरू होते आणि वीर्यस्खलनाची सुरुवात झाल्यानंतर एक ते तीन सेकंदांसाठी सुरू असते. वीर्यस्खलनाचा पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणजे असा क्षण की ज्या क्षणी कोणत्याही स्थितीत स्खलन थांबू शकत नाही. हे वाचा - Period मिस होण्याआधीच जाणीव होईल Pregnancyची; ही आहेत लक्षणं ऑरगॅझममुळे आनंद मिळतो. पण काही पुरुषांमध्ये ऑरगॅझम न होताही स्खलन होऊ शकतं. अशा व्यक्तींना मिळणाऱ्या आनंदाची पातळी कमी असते. तुम्हाला उद्दीपित (Arousal) करणं हे तुमच्या जोडीदाराचं काम असतं. -अनेकांना असं वाटत असतं, की आपल्याला सेक्ससाठी उद्दीपित करणं हे आपल्या जोडीदाराचं काम असतं; पण हे चुकीचं आहे. आपल्या उद्दीपनासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असतो. संभोगाचा अधिक आनंद मिळवायचा असेल, तर उद्दीपित झाल्यावर सुरुवात करण्यापेक्षा त्याआधी सुरुवात करायला हवी. जोडीदारासह सेक्स करण्यापूर्वी स्वतःला ठराविक ठिकाणी स्पर्श करून, सेक्स टॉय वापरून, फँटसीचा विचार करून, कामुक साहित्य वाचून किंवा पाहून स्वतःला उद्दीपित केल्यास खूप जास्त आनंद मिळतो. हे विधान खासकरून महिलांच्या बाबतीत जास्त खरं आहे. -दर सात सेकंदांनी पुरुषांच्या मनात सेक्सचा विचार येत असतो. -हे वाक्य बऱ्याचदा वाचण्यात येतं. मात्र ते सिद्ध करण्यासाठी पुरेसं संशोधन झालेलं नाही. पुरुषांच्या मनात सेक्सविषयक विचार महिलांच्या तुलनेत जास्त वेळा येतात, हे खरं असलं तरी त्यांचं प्रमाण इतकंही जास्त नाही. सेक्स या विषयातला संशोधक आल्फ्रेड किन्सेने (Alfred Kinsey) केलेल्या संशोधनातही असं आढळलं होतं, की 54 टक्के पुरुष एका दिवसात अनेकदा सेक्सचा विचार करतात, 43 टक्के पुरुष एका आठवड्यात किंवा महिन्यात काही वेळा सेक्सचा विचार करतात, तर चार टक्के पुरुष महिन्यातून एकदा सेक्सचा विचार करतात. हे वाचा - मॉडेलसोबत रोमान्स करताना अचानक आली बायको; लपण्याच्या धडपडीत गायकाने गमावला जीव अलिकडे ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीने (Ohio State University) विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातल्या विविध विचारांची नोंद हातातल्या काउंटरच्या सहाह्याने ठेवायला सांगितली होती. त्यात सेक्स, अन्न आणि झोप या विषयांवरच्या विचारांचा समावेश होता. एक पुरुष दिवसातून सरासरी 19वेळा, तर एक स्त्री दिवसातून सरासरी 10 वेळा सेक्सविषयी विचार करते, असं त्यात आढळलं होतं. -धूम्रपानामुळे सेक्सची इच्छा मरते. -धूम्रपानामुळे किंवा अमली पदार्थामुळे सेक्सची इच्छा मरते, असं म्हटलं जातं. मात्र अमेरिकेत झालेल्या एका मोठ्या सर्वेक्षणात असं आढळलं, की धूम्रपान किंवा अमली पदार्थांचं सेवन केलेल्या स्त्री आणि पुरुषांमध्ये सेक्स करण्याचं प्रमाण जास्त आहे. -इरेक्शन (Erection) केवळ पुरुषांमध्येच होतं. -हा एक गैरसमज आहे. स्त्रियांमध्येही इरेक्शन होतं. मात्र ते पुरुषांप्रमाणे दिसण्यात येत नाही. पुरुषांचं लिंग अर्थात पेनिसप्रमाणेच (Penis) स्त्रियांच्या शरीरातलं क्लिटोरिसही (Clitoris) तशाच प्रकारच्या स्पंजसारख्या ऊतींपासून बनलेलं असतं. उद्दीपित झाल्यानंतर तेही विस्तारतं आणि त्यात रक्त सळसळू लागतं. जेव्हा ते लैंगिकक्रिया करताना उद्दीपित केलं जातं, तेव्हा त्याचा आकारही वाढतो. -प्रसूती लवकर होण्यासाठी सेक्स करणं फायद्याचं. (Labour) -गर्भवती महिलांना काही डॉक्टर्स सल्ला देतात,की प्रसूती लवकर व्हायला हवी असेल, तर सेक्स करणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात संशोधनात मात्र नेमकं उलट आढळलं आहे. अमेरिकेतल्या ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीत अलिकडेच झालेल्या संशोधनात असं आढळलं आहे, की प्रसूतीची तारीख जवळ आलेली असताना सेक्स केल्यास प्रसूतीला चालना तर मिळत नाहीच, उलट त्याला उशीरच होऊ शकतो. गर्भारपणाच्या शेवटच्या तीन आठवड्यांत सेक्स करणाऱ्या महिलांचं बाळंतपण 39.9 आठवडे चाललं, तर त्या कालावधीत सेक्स न करणाऱ्या महिलांचं बाळंतपण 39.3 आठवडे चाललं. -महिलेचे अनेक जोडीदार असले, तर तिच्या व्हजायनाचा (Vagina) आकार मोठा होतो. -असं नसतं. व्हजायनल कॅनल हा एक स्नायू असतो. त्यातून पुरुषाचं लिंग आत जाताना किंवा बाळ बाहेर येताना हे स्नायू ताणले जातात. अनेक जोडीदार असले किंवा जोडीदाराच्या लिंगाची जाडी जास्त असली किंवा मोठ्या आकाराचं सेक्सटॉय वापरलं तरी त्यावर व्हजायनाचा टाइटनेस अवलंबून नसतो. व्हजायनाच्या आकारावर काहीही अवलंबून नसतं. -डोकेदुखीचा त्रास असलेल्यांना सेक्सची इच्छा होत नाही. -असं म्हटलं जातं. मात्र मायग्रेन (Migraine) अर्थात अर्धशिशीची डोकेदुखी असलेल्यांसाठी हे खरं नाही. मायग्रेन असलेल्या व्यक्तींची सेक्सची इच्छा खूप जास्त असते. कारण या दोन्ही गोष्टी मेंदूतल्या एकाच रसायनामुळे घडतात, असं मानलं जातं. -लिंग फ्रॅक्चर होऊ शकत नाही. -पुरुषाचं लिंग अर्थात पेनिस ब्रेक होऊ शकत नाही, असं काही जणांना वाटतं, मात्र तसं नाही. प्रत्यक्षात तसं घडू शकतं. त्याला पेनाइल फ्रॅक्चर (Penile Fracture) असं म्हणतात. सेक्स करताना पुरुषाचं लिंग ताठरलेलं असताना आणि ते महिलेच्या व्हजायनामध्ये असताना त्या जोडप्याने सेक्सची स्थिती अचानक बदलली, तर पेनाइल फ्रॅक्चर होऊ शकतं. ताठरलेलं लिंग कशावर तरी जोरात आपटलं गेलं, तरीही हे घडू शकतं. -सेक्शुअल फँटसी (Sexual Fantasy) अर्थात सेक्सबद्दलच्या कल्पना अनेक जण करतात; त्या प्रत्यक्षात आणणारे मात्र फार थोडे असतात. डॉ. जस्टिन लेहमिलर यांनी सेक्शुअल फँटसीजबद्दलचा आतापर्यंतचा सर्वांत व्यापक अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी 4000 हून अधिक व्यक्तींशी संवाद साधला. 89 टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी ग्रुप सेक्सची फँटसी असल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात केवळ 30 टक्के जणांनी त्याचा अनुभव घेतला. केवळ तीन टक्के जणांनी अजिबात सेक्शुअल फँटसी अनुभवत नसल्याचं सांगितलं. -लिंगाच्या जाडीपेक्षा लांबी महत्त्वाची -अनेक पुरुषांना त्यांच्या लिंगाच्या लांबीविषयी अधिक अप्रूप असतं. स्त्रियांना मात्र पुरुषांच्या लिंगाच्या लांबीपेक्षा जाडीत जास्त रस असतो. हे वाचा - Fungus मुळे लैंगिकदृष्ट्या उतावळा होतो हा जीव; 4-6 आठवडे संबंधांनंतर होतो मृत्यू नेदरलँड्समधल्या एका सर्वेक्षणात 170 महिलांना याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा जाडीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरुषांच्या आरोग्यविषयक मासिकाने अलिकडेच केलेल्या एका सर्वेक्षणातही 70 टक्के महिलांनी जाडीला, तर 18 टक्के महिलांनी लिंगाच्या लांबीला महत्त्व दिलं. शरीर शास्त्रीयदृष्ट्याही या आवडीमार्गे तर्क आहे. लिंग जितकं जाड असेल, तितका संभोगादरम्यान महिलांना मिळणारा उद्दीपनाचा आनंद जास्त असू शकतो. -स्त्री-पुरुषांना वेगवेगळ्या वयात सेक्सविषयी अधिक रस असतो. -पुरुषांना वयाच्या 18 व्या वर्षी, तर महिलांना त्यांच्या तिशीत सेक्समध्ये अधिक स्वारस्य असतं, असा एक समज आहे. या वयात पुरुषांचा स्टॅमिना अधिक असतो, तर स्त्रियांना त्यांचं शरीर कळलेलं असतं, या समजावर तो आधारलेला आहे. प्रत्यक्षात मात्र सेक्समध्ये स्वारस्य असल्याच्या भावनेत स्त्री-पुरुषांमध्ये काहीही भेद नाही. अमेरिकन स्त्री-पुरुषांना त्यांच्या पंचविशीत सेक्सची इच्छा सर्वाधिक असते. तसंच, सेक्सची इच्छा होणं ही गोष्ट स्त्री आणि पुरुषांमध्ये त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी बदलत असते. एखाद्या वेळी ती सर्वांत जास्त असू शकते, तर एखाद्या वेळी ती कमी असू शकते.
First published:

Tags: Relationship, Sex, Sexual health, Sexual relationship, Sexual wellness

पुढील बातम्या