Home /News /lifestyle /

Autosexual : ...जेव्हा स्वतःच्याच प्रेमात पडते व्यक्ती; इतरांऐवजी स्वतःकडेच होते आकर्षित

Autosexual : ...जेव्हा स्वतःच्याच प्रेमात पडते व्यक्ती; इतरांऐवजी स्वतःकडेच होते आकर्षित

ऑटोसेक्शुअल हा शब्द, संकल्पना ऐकायला विचित्र वाटत असली तरी हळूहळू ऑटोसेक्शुअल लोकांची संख्या वाढत आहे.

मुंबई, 30 ऑक्टोबर : सध्या ऑटोसेक्शुअल (Autosexual) हा शब्द बऱ्याचदा ऐकायला मिळतो. या शब्दावरूनच साधारण अंदाज येतो. ऑटोसेक्शुअल लोक स्वत:कडेच जास्त आकर्षित होतात. असे लोक जे विरुद्धलिंगी व्यक्तींकडे आकर्षित होण्याऐवजी स्वत:कडेच जास्त आकर्षित होतात त्यांना ऑटोसेक्शुअल (Autosexual and Sexual Orientation) म्हटलं जातं. अशा व्यक्ती स्वत:च्या शरीराकडे जास्त आकर्षित होतात आणि स्वत:ला बघून स्वत:लाच कामसुख देऊ शकतात. या व्यक्ती होमो सेक्शुअल किंवा लेस्बियन असतात असं नाही. ‘हेल्थलाईन’ने दिलेल्या वृत्तानुसार ऑटोसेक्शुअल हा शब्द, संकल्पना ऐकायला विचित्र वाटत असली तरी हळूहळू ऑटोसेक्शुअल लोकांची संख्या वाढत आहे. होमोसेक्शुअल (Homosexual) किंवा लेस्बियनसारखाच (Lesbian) आता ऑटोसेक्शुअल हा शब्दही वारंवार वापरला जात आहे. या व्यक्ती स्वत:ला ऑटोसेक्शुअल असल्याचं सांगतही आहेत. या शब्दाबद्दल सध्या बरेच गैरसमज आहेत. आपण जाणून घेऊयात ऑटोसेक्शुअल म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय आणि ही वैद्यकीय समस्या आहे का? ऑटोसेक्शुअल व्यक्ती कशा असतात? ऑटोसेक्शुअल (Autosexual) व्यक्तीचं स्वत:वरच सगळ्यात जास्त प्रेम असतं. अशी व्यक्ती सगळ्यात आधी स्वत:च्या सेक्शुॲलिटीकडे आकर्षित होते. ऑटोसेक्शुअल व्यक्तींना इतरांप्रति कामभावना नसतात आणि असल्या तरी त्या अगदीच कमी प्रमाणात. याचा अर्थ असा नाही की ऑटोसेक्शुअल व्यक्ती इतरांकडे सेक्शुअली आकर्षित होत नाहीत किंवा इतरांबरोबर कामसंबंध ठेवू शकत नाहीत. काही ऑटोसेक्शुअल व्यक्ती अन्य व्यक्तींसोबत कामसंबंध प्रस्थापितच करू इच्छित नाहीत. त्यांना स्वत:पेक्षा अन्य कुणीही जास्त आकर्षक वाटत नाही. हे वाचा - sperm : हवा प्रदूषणामुळं पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या होतेय कमी; नवं संशोधन ऑटोसेक्शुअल आणि ऑटोरोमँटिक एकच आहे का? ऑटोसेक्शुअलबरोबरच सध्या ऑटोरोमँटिक (Autoromantic) हा शब्दही ऐकायला मिळतोय. ऑटोसेक्शुअल आणि ऑटोरोमँटिक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ऑटोसेक्शुअल व्यक्ती स्वत:कडेच सेक्शुअली आकर्षित होते तर ऑटोरोमँटिक व्यक्ती मुख्यत: स्वत: ला आकर्षक समजतात. ऑटोसेक्शुअल व्यक्ती दरवळेस स्वत:ला आकर्षक समजतीलच असं नाही. अशा व्यक्ती स्वत:कडे फक्त सेक्शुअली आकर्षित होतात असंही होऊ शकतं. कशा असतात कामभावना? ऑटोसेक्शुअल व्यक्ती स्वत:कडेच सेक्शुअली आकर्षित होत असल्यामुळे अशा बहुतेक व्यक्ती हस्तमैथुन करून स्वत:चं समाधान करून घेतात. या व्यक्ती दुसऱ्यांकडे सेक्शुअली आकर्षित सहसा होत नाहीत. याचा अर्थ असा नाही की अशा व्यक्ती इतर व्यक्तींबरोबर कामसंबंध ठेवू शकत नाहीत. हे वाचा - Breast Cancer : पुरुषांनाही होतो 'ब्रेस्ट कॅन्सर' अशी असतात लक्षणं, वेळीच ओळखा ऑटोसेक्शुअल बनण्याचं कारण? व्यक्ती ऑटोसेक्शुअल का बनतात याचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही. हा कोणताही वैद्यकीय आजार किंवा ही कोणतीही वैद्यकीय समस्या नाही. याचा प्रजननावर काही फरक पडतो का? ऑटोसेक्शुअल व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या इतरांप्रमाणेच असतात. त्यामुळे त्यांची शरीर रचना सामान्य स्री व पुरुषांप्रमाणेच असते म्हणजे ते प्रजनानासाठी योग्य असतात. अन्य व्यक्तींसोबत जर यांचे कामसंबंध आले तर सामान्य व्यक्तींप्रमाणे त्या व्यक्तीही मुलं जन्माला घालण्यात सक्षम असतात.
First published:

Tags: Lifestyle, Sex, Sexual health

पुढील बातम्या