Home /News /lifestyle /

Sex Education | आता foreplay नाही तर Afterplay चा ट्रेंड! तुमच्यासोबत असं होतं का?

Sex Education | आता foreplay नाही तर Afterplay चा ट्रेंड! तुमच्यासोबत असं होतं का?

सेक्सनंतर (Sex) लगेच झोप लागणे किंवा इतर कामात व्यस्त राहिल्याने दोन पार्टनरमधील कम्युनिकेशन गॅप निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट करायचे असेल, तर आफ्टरप्लेवर (Afterplay) किमान 20 मिनिटे घालवावी लागतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जानेवारी : शाररिक संबंधावेळी बहुतेक लोकं एक चूक करतात ती म्हणजे फक्त इंटरकोर्सवर लक्ष केंद्रित करणे. आधी आणि नंतरच्या क्षणांवर फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र, सेक्सला 100 मीटर धावण्याची शर्यत समजू नका, जी शक्य तितक्या लवकर आणि कमीत कमी मिनिटांत पूर्ण करण्याची घाई आहे. त्याऐवजी सेक्सला मॅरेथॉन समजा, ज्यामध्ये तुम्ही फोरप्ले (foreplay) आणि आफ्टरप्लेवर (Afterplay) जितके जास्त लक्ष केंद्रित कराल, तितकाच तुम्हाला संभोगाचा आनंद मिळेल. सेक्सपेक्षा फोरप्ले महत्त्वाचा आहे यात शंका नाही. जर फोरप्ले चांगला असेल तर, दोन्ही जोडीदारांची उत्तेजना योग्य प्रकारे वाढते. शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीने पार्टनर स्टिम्यूलेट होतात, ज्यामुळे सर्वोत्तम इंटरकोर्ससाठी भावना तयार होते. मात्र, दोघांच्यात योग्य सुसंवाद नसेल तर उत्कृष्ट फोरप्ले आणि आनंददायी सेक्स सेशनही खराब होऊ शकतो. आफ्टरप्ले म्हणजे काय? मी 18 वर्षांची महाविद्यालयीन विद्यार्थीनी आहे. मी बर्‍याचदा नियतकालिकांमध्ये आफ्टरप्लेबद्दल लैंगिक लेख वाचले आहेत. मला याबद्दल जाणून घ्यायचे आहे. लैंगिक समाधानासाठी हे आवश्यक आहे का? शेखर शर्मा, जबलपूर. लैंगिक संबंधात संभोगापूर्वी जोडीदारांनी एकमेकांना प्रेमाने स्पर्श करणे, हात हातात घेणे, मिठी मारणे, प्रेम करणे याला 'फोरप्ले' म्हणतात. जेव्हा या सर्व क्रिया संभोगानंतर केल्या जातात तेव्हा त्याला 'आफ्टरप्ले' म्हणतात. लैंगिक समाधानासोबतच परस्पर जिव्हाळ्याचे नातेही त्यांच्यामुळे घट्ट होते. सेक्सोलॉजिस्टच्या मते, जिथे पुरुष सेक्समध्ये शरीराला प्राधान्य देतात, तिथे स्त्रिया भावनांना प्राधान्य देतात. पण शारीरिक समाधानासाठी जेवढे फोरप्ले आवश्यक आहे तेवढेच भावनिक समाधानासाठी आफ्टरप्ले आवश्यक आहे. त्यामुळे जोडीदाराला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या संतुष्ट करण्यासाठी सेक्सपूर्वी फोरप्ले आणि आफ्टरप्ले करणे आवश्यक आहे. Sex Education | शारीरिक आकर्षण, प्रेम की केमिकल लोच्या? कसं ओळखाल? जर सेक्स सेशननंतर दोन्ही पार्टनर बेडच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात झोपायला गेले किंवा त्यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासायला लागले किंवा लगेच बेडरूमच्या बाहेर टीव्ही पाहण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी गेले तर दोघांनाही त्यांच्या आफ्टरप्लेच्या रणनीतीवर अधिक काम करण्याची गरज आहे. ऑर्गेज्म प्राप्त केल्यानंतर सहसा मिठी मारणे, बोलणे आणि स्पूनिंग सारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सेक्सनंतरचा वेळ आफ्टरप्लेसाठी ठेवा. तुमच्या जोडीदारासोबत काही प्रेमळ गोष्टी करा, एकमेकांना किस करा इ. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सेक्सनंतरही घट्ट करायचे असतील, तर आफ्टरप्लेवर किमान 20 मिनिटे घालवावीत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sex education, Sexual health

    पुढील बातम्या