Home /News /lifestyle /

कपल्स ठराविक कालावधीनंतर Sex का थांबवतात? ही आहेत 5 महत्त्वाची कारणं

कपल्स ठराविक कालावधीनंतर Sex का थांबवतात? ही आहेत 5 महत्त्वाची कारणं

काही जोडपी अशी असतात, ज्यांच्यामध्ये लग्नानंतर एका वर्षभरातच किंवा काही काळानंतर सेक्स होणं कमी किंवा बंदच होतं. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही कारणं माहित करून घेतल्यास त्यावर उपाययोजना करता येईल

मुंबई, 15 जानेवारी: आजही सेक्सबाबत (Sex Education) खुलेआम बोलणं गैर मानलं जातं. विवाहित जोडप्यांमध्येदेखील (Married Couples) याबाबत फार चर्चा होत नाही. महिलांनी याविषयी बोलणं म्हणजे तर पापच मानलं जातं. एकांतात, बंद खोलीतच याविषयी थोडफार बोललं जातं, तेही अगदी कुजबुजत. खरं तर, कोणत्याही रोमँटिक किंवा वैवाहिक नात्यात शारीरिक जवळीक ते नातं टिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. जोडीदारांमध्ये परस्पराविषयी प्रेम, भावनिक ओलावा नसेल तर त्याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो; तसाच परिणाम सेक्स लाईफ (Sex Life) चांगलं नसेल तरीदेखील होतो. जोडीदार सेक्स लाईफबाबत समाधानी नसेल तरीही नातं कायमचं तुटू शकतं. काही जोडपी अशी असतात, ज्यांच्यामध्ये लग्नानंतर एका वर्षभरातच किंवा काही काळानंतर सेक्स होणं कमी किंवा बंदच होतं. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही कारणं जाणून घेतल्यास त्यावर उपाययोजना करून सेक्स लाइफ पुन्हा पूर्वीप्रमाणे असणं शक्य होतं. जाणून घेऊ या पाच महत्त्वाची कारणे. हे वाचा-व्हेगन झाल्यामुळे सेक्स लाईफ सुधारली; महिलेच्या दाव्यामुळे नागरिक हैराण! थकवा : (EXHAUSTION) तुमच्या जोडीदारासोबत सेक्स लाईफ सुरळीत असण्यासाठी तुम्हाला उत्साह असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कामामुळे तणावग्रस्त असाल किंवा तुमचं कामाचा वेळ अधिक असेल, घरी येईपर्यंत तुम्ही खूप थकून जात असाल तर तुम्हाला सेक्ससाठी उत्साह उरत नाही. घरी मुलं असतील आणि जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या नसतील तुमचा जोडीदार घरच्या कामामध्ये अडकून राहू शकतो, परस्परांना वेळ देऊ शकत नसल्यानं ताणतणाव वाढतो आणि त्याचा परिणाम सेक्सलाईफवर होतो. स्वतःच्या शरीराविषयी नाराजी : (DISSATISFACTION WITH OWN BODY) अनेक लोक आपल्या स्वतःच्या शरीराच्या आकाराबद्दल नाराज असतात. आपलं शरीर आकर्षक नाही याची खंत त्यांना जाणवत असते त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराबद्दल लाज वाटत असते. त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असते आणि ही भीती सेक्सची इच्छा कमी करू शकते. एक जोडीदार तंदुरुस्त असल्‍यास दुसऱ्या जोडीदारामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हे वाचा-Sex Education | आऊटरसकोर्स म्हणजे काय रं भाऊ? कंटाळवाणेपणा : (BOREDOM) एखादे जोडपे सवयीने सेक्स करत असेल तर काही काळानंतर त्यांना त्यात कंटाळवाणेपणा येतो. त्यांना सेक्सचा उत्साह, इच्छा उरत नाही. अशावेळी सेक्समध्ये वेगळेपण येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याकरता पोझिशन्स बदलणे, अधिक आनंददायक फोरप्ले करणे आवश्यक आहे. कंटाळवाण्या सेक्सचा शेवट सेक्स बंद होण्यात होतो. विसंवाद: (CONFLICT IN IDEOLOGIES) सेक्स लाईफ आनंदी, समाधानकारक असण्यात जोडीदारांमधील मानसिक किंवा भावनिक सख्यही महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये मतभेद असतील, तर ते त्याचा परिणाम सेक्स लाईफवर होतो. तुमच्या मनात नाराजीची भावना निर्माण होऊ लागते आणि जोडीदाराशी शारीरिक जवळीक साधणं कठीण होतं. अस्वच्छता : (BAD HYGIENE) सेक्समध्ये स्वच्छता हा घटक देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमचा जोडीदार दिवस दिवस आंघोळ करत नसेल, दात घासत नसेल किंवा त्याला इतर घाणेरड्या सवयी असतील तर तुम्हाला त्याच्याविषयी घाण वाटेल, त्याच्याबरोबर सेक्स करण्याची इच्छा होणार नाही.
First published:

Tags: Sex, Sex education, Sexual health, Sexual relationship

पुढील बातम्या