Home /News /lifestyle /

Sex Education | आऊटरसकोर्स म्हणजे काय रं भाऊ?

Sex Education | आऊटरसकोर्स म्हणजे काय रं भाऊ?

आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असला आणि क्षणात तुम्ही त्यावर पॉर्न किंवा इतर माहिती मिळवत असला तरीही देशात सेक्स (Sex) संदर्भात अजूनही खूप अज्ञान असल्याचे पाहायला मिळतं. चुकीच्या माहितीमुळे अनेकदा अपघात होतात.

    आपल्याकडे अजूनही सेक्स (Sex) संदर्भात अनेक समज गैरसमज पसरलेले पाहायला मिळतात. योग्य वयात लैंगिक शिक्षण मिळत नसल्याचा हा परिणाम मानला जातो. यामुळे अनेकदा तरुण-तरुणी चुकीच्या माहितीला बळी पडतात. अज्ञानामुळे अनेकदा आपण काही चुकीचं करतोय का? याचीही कल्पना आपल्याला नसते. अनेकदा यामुळे पश्चातापाचीही वेळ येते. काहीजण यातून सावरतात तर काही यातच अडकून पडतात. लैंगिक शिक्षण ही काळाजी गरज झाली आहे. आपण या लेखांच्या माध्यमातून सेक्स संदर्भात असलेले अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा विषय आहे आऊटरसकोर्स (outercourse). संभोग (Intercourse) सोडून तुम्ही जे काही सेक्स म्हणून करता, ते म्हणजे आऊटरसकोर्स असं म्हणता येईल. स्वत: लैंगिक सुख अनुभवण्यासाठी केलेली सर्वात पहिली कोणती सेक्सुअल अॅक्टिव्हिटी असेल ती म्हणजे हस्तमैथुन (Masturbation). यामध्ये Orgasm साठी स्वत:चे गुप्तांग, तसंच ब्रेस्टसारख्या संवेदनशील भागाला उत्तेजित केलं जातं. फक्त मुलंच हस्तमैथुन करतात असं समजलं जातं, मात्र मुलीही हस्तमैथुन करतात आणि त्यापासून आनंद घेतात. हस्तमैथुन हे हानीकारक आहे, असंही समजलं जातं मात्र हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. “जेव्हा मी 12 वर्षांचे होते, तेव्हा मी माझं व्हजायना (vagina) किंवा माझ्या मांड्या (thighs) एकमेकांवर घासायचे. त्यानंतर माझी पँटी ओली व्हायची आणि मला खूप बरं वाटायचं. त्यानंतर मी सुरुवातीला माझी बोटं आणि इतर वस्तू त्या ठिकाणी घासल्या. मी 16 वर्षाचे झाले, तेव्हा मला माझ्या चुलत बहिणीने सांगितलं की याला हस्तमैथुन म्हणतात, म्हणजेच माझ्या शरीराला आता सेक्स करण्याची गरज आहे. माझ्या बहिणीने सांगेपर्यंत तर मी जे काही करत होते, त्याला हस्तमैथुन म्हणतात याबाबत मला काहीच माहिती नव्हती. 20 वर्षांची झाल्यानंतर मी मुलासोबत सेक्स केला, आताही मी हस्तमैथुन खूप करते - दीपा (नाव बदललेलं), वय  22, नर्सिंग स्टुडंट, जमशेदपूर 2 व्यक्तींमध्ये सामान्यपणे होणारी सेक्शुअल अॅक्टिव्हिटी म्हणजे किसिंग. तोंडाने किसिंग करणे हे सामान्य आहे आणि याला पूर्णपणे पाश्चिमात्य संकल्पना (western concept) समजली जात नाही. कामसूत्र (Kamasutra) च्या दुसऱ्या भागातील तिसऱ्या प्रकरणात किसबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आता तर टीव्ही आणि चित्रपटांमध्ये देखील तरुण किसिंग पाहतात. पाश्चात्य जगात ओठांनी किसिंग करणं सामान्य आहे आणि अगदी कुटुंबामध्येही बिनधास्त आणि सोयीस्करपणे केलं जातं. Sex Education | पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही हवा असतो SEX मात्र.. तरुणांमध्ये होणारी दुसरी सेक्शुअल अक्टिव्हिटी म्हणजे Oral sex. Penetration (संभोग) नको असेल तर ओरल सेक्स केला जातो. तोंड, जीभ आणि ओठांच्या स्पर्शाने गुप्तांगांना उत्तेजित केलं जातं. प्रत्यक्ष संभोगापूर्वी होत असलेल्या कामक्रीडेत असं सामान्यपणे केलं जातं. काही संस्कृतींमध्ये याला गलिच्छ (dirty), अनैसर्गिक (unnatural) आणि पाप (religiously sinful) म्हटलं जातं. या सेक्सबाबतही अनेक गैरसमज तर आहेच. शिवाय ओरल सेक्सने प्रेग्नन्सीचा धोका नसला तरी कंडोम न वापरल्यास लैंगिक संक्रमित संसर्गाचा धोका (sexually transmitted infections – STI) असतो, हे तरुण विसरतात. लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb  संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sex, Sex education

    पुढील बातम्या