Sex केल्यानंतर वजनावर परिणाम; स्त्रिया जाड आणि पुरुष बारीक होतात का?

Sex केल्यानंतर वजनावर परिणाम; स्त्रिया जाड आणि पुरुष बारीक होतात का?

सेक्समुळे (Sex) वजनावर (Weight) परिणाम होतो, मात्र तो चांगला असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

गांधीनगर, 24 फेब्रुवारी : लग्नानंतर बहुतेक स्त्रियांचं वजन (Weight) वाढतं आणि या वजन वाढीचा संबंध थेट सेक्सशी (sex) जोडला जातो. सेक्समुळे स्त्रियांचं वजन वाढतं, महिला लठ्ठ होतात, असं तुम्ही ऐकलं असेलच. त्यामुळे अनेक स्त्रिया आपण जाड होऊ नये, यासाठी सेक्स टाळतात. आपण लठ्ठ तर होणार नाही ना ही भीती त्यांच्या मनात असते.

मात्र खरंच सेक्स केल्यानंतर स्त्रियांचं वजन वाढतं का? स्त्री आणि पुरुषांच्या वजनावर सेक्सचा परिणाम होतो का? आणि परिणाम होत असेल तर तो कसा? याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर 'न्यूज 18 गुजरात'साठी सेक्सॉलॉजिस्ट डॉ. पारस शाह यांनी उत्तर दिलं आहे.

हेदेखील वाचा - गूड न्यूज ! आता स्त्रियांसाठीही आला Vigra; सुपरमॉडेलनं लाँच केला प्रोडक्ट

डॉ. पारस शाह यांनी सांगितलं की,  लैंगिक संबंधांबाबत अनेक गैरसमज आहेत. वीर्य खूप शक्तिशाली आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आलं आहे. जास्त लैंगिक संबंध ठेवल्यास स्त्रियांचं शरीर सूजतं किंवा त्या लठ्ठ होतात आणि पुरुष कमजोर, बारीक होतात असं म्हटलं जातं. मात्र यात काहीच तथ्य नाही. वीर्यामध्ये शर्करा असते, ज्याला फुकोज असं म्हटलं जातं. मात्र हे शुक्राणूंच्या पोषणासाठी पुरेसं असतं. महिलेच्या वजनात बदल होईल, इतकी सक्षमता त्यात नसते”

“उलट एकदा शारीरिक संबंधांमुळे जवळपास अडीच कॅलरी कमी होते. ही कॅलरी शुक्राणूंमुळे नाही तर गतीमुळे कमी होते. त्यामुळे जर जाड व्यक्ती नियमित शारीरिक संबंध ठेवत असेल, तर तो आपल्या या शरीररचनेतून बाहेर पडण्यास सक्षम असेल. सेक्स हा असा व्यायाम आहे, ज्याचा कंटाळा येऊ शकत नाही”

हेदेखील वाचा - तरुणी ते महिला, Vagina चा प्रवास; वयासोबत योनीमध्ये असे होतात बदल

First published: February 24, 2020, 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading