SEX चा असाही फायदा; आयुष्य वाढत असल्याचा संशोधकांचा दावा

SEX चा असाही फायदा; आयुष्य वाढत असल्याचा संशोधकांचा दावा

सेक्स (Sex) लाइफ चांगली असेल तर आरोग्याच्या इतर समस्याही कमी होतात, असं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

सकस आहार, पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम एकंदरच चांगली जीवनशैली हा जास्त आयुष्य जगण्याचा मार्ग. मात्र आता यामध्ये सेक्सचाही (sex) समावेश झाला आहे. हो... सेक्समुळेदेखील आयुष्य वाढतं, असा दावा संशोधकांनी केला आहे. न्यू इग्लंड रिसर्च इन्स्टिट्युटनं (New England Research Institute) याबाबत अभ्यास केला. दररोज सेक्स केल्यानं हृदयविकाराचा (Heart attack) धोका कमी होतो, तसंच शरीरात निर्माण होणाऱ्या अन्य व्याधींनाही आळा बसू शकतो, असं संशोधक म्हणाले.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात 65 वर्षांवरील 1120 पुरुष आणि महिला यांचा समावेश होता. 22 वर्षांच्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार शास्त्रज्ञांच्या मते, सेक्समुळे केवळ शरीर सुखावतं असं नाही, तर मनही सुखावतं. सेक्समुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.  रक्तदाब (Blood Pressure)नियंत्रणात राहतो, प्रतिकारशक्ती वाढते,हृदयाशी संबधित आजारांचा धोकाही कमी होतो, त्यामुळं आयुष्य वाढतं.

सेक्सचा आहे हृदयविकाराशीही संबंध

या अभ्यासानुसार, सेक्सलाईफ चांगलं असेल तर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता वाढते. आठवड्यातून एकदा सेक्स केल्यानं आयुष्य वाढण्याची शक्यता 37 टक्क्यांनी वाढते. आठवड्यातून एकापेक्षा अधिक वेळा सेक्स करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर  मृत्यूची शक्यता 27 टक्के कमी होते. तर कधी कधी सेक्स करणाऱ्यांमध्ये ही शक्यता 8 टक्के असते.

हे वाचा -  Sexual Wellness : शरीरसुखासाठी नुसतं सेक्स नव्हे, एकमेकांशी संवादही महत्त्वाचा

हदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तरीही आठवड्यातून एकदा सेक्स केल्यास शरीराला फायदा होतो. अर्थात तुम्ही आणि तुमच्या जोडीदारात किती प्रेम आहे हेही महत्त्वाचं ठरतं, असंही या अभ्यासात म्हटलं आहे. अर्थात हे संशोधन समोर आलं असलं तरीही प्रत्येकानी त्याची प्रकृती पाहूनच निर्णय घ्यायला हवा.

पुरुषाच्या सक्रियतेशीही संबंध

काही वर्षांपूर्वी अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियालॉजीमध्येही (American Journal Of Cardiology) अशाप्रकारचा एक अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार जे पुरुष कमी सेक्स करतात त्यांच्यामध्ये हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो तसंच इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रासही वाढतो.

हे वाचा - 'ही' कंपनी घरकामासाठी 'नग्न' महिला पुरवते, जाणून घ्या 1 तासाचा दर किती आहे?

जे पुरुष लैंगिक क्रिया करण्यास सक्षम असतात, त्यांची शारीरिक हालचालीची क्षमताही अधिक असते, त्यामुळे शरीर स्वस्थ राहतं, असा निष्कर्षही अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियालॉजीमध्ये (American Journal Of Cardiology) नोंदवण्यात आला होता. या संशोधनामुळे शारीरिक आरोग्य आणि सेक्स या विषयातील परस्परसंबंधाबद्दलच्या संशोधनाला नवीन वळण मिळालं असून, यावरील संशोधनाला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.

Published by: Priya Lad
First published: December 17, 2020, 9:04 AM IST

ताज्या बातम्या