रिलेशनशिपमध्ये चीटिंगचा हा नवा प्रकार, तुमच्यासोबत झालंय का 'मायक्रो- चीटिंग'

रिलेशनशिपमध्ये चीटिंगचा हा नवा प्रकार, तुमच्यासोबत झालंय का 'मायक्रो- चीटिंग'

सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंगच्या या जमान्यात ही चीटिंग पकडणं सर्वात अवघड काम आहे.

  • Share this:

डेटिंग आणि हूक अप्सनंतर सध्या एका नवीन रिलेशनशिप ट्रेण्डने डोकं वर काढलं आहे. रिलेशनशिपमधील एक विशेष सवय या मायक्रो डेटिंग ट्रेण्डला वर आणत आहे. ही फसवणूक एवढ्या मायक्रो लेवलवर असते की, ती पकडणं फार कठीण असतं. रिपोर्टनुसार, हा ट्रेण्ड सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंगच्या या जमान्यात ही फसवणूक पकडणं सर्वात अवघड काम आहे. पण एकंदरीत चीटिंगच्या प्रकारातच हाही प्रकार मोडला जातो, ज्यात पार्टनरची फसवणूक केली जाते.

काय असतं मायक्रो- चीटिंग-

मायक्रो- चीटिंग हे एक प्रकारचं अफेअरचं असतं. पण यात फिजिकल रिलेशनशिप नसतं. ते भावनिकरित्या एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. यात फ्लर्टिंग, एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टला सतत लाइक करणं आणि चॅटिंग करणं या गोष्टींचा समावेश असतो.

तज्ज्ञांचं यावर मत काय-

The Sun वेबसाइटने एक्सपर्टचा संदर्भ देत म्हटलं की, प्रगत तंत्रज्ञान आणि सोशल मीडियासारख्या बर्‍याच प्लॅटफॉर्ममुळे लोकांना आता त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्याचं वाटतं. यामुळेच लोक अशाप्रकारच्या रिलेशनशिपमध्ये येत आहेत.

रिपोर्टनुसार हा एक चुकीचा निर्णय आहे. कारण हे नातं ऑनलाइन फ्लर्टिंगने सुरू होतं आणि हळूहळू हे सिरीयस रिलेशनशिप होऊन जातं. यात नंतर मानसिक गुंतणंही वाढतं. फिजिकल रिलेशनशिप जेवढं घातक असतं तेवढंच घातक दुसऱ्यामध्ये भावनिक गुंतणंही असतं. कारण दोन्ही प्रकारात तुम्ही तुमच्या पार्टनरची फसवणूक करत असता. मायक्रो- चीटिंगमुळे तुमचं दीर्घकाळ टिकलेलं नातंही तुटू शकतं.

तुम्ही पार्टनरला दिवसभर मेसेज पाठवता तर हे एकदा वाचाच!

तुम्हाला विसरण्याची सवय आहे का, मग ही योगासनं करतील तुमची मदत

सावधान! लग्नाशी निगडीत या गोष्टी सोशल मीडियावर कधीच शेअर करू नका

तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

Published by: Madhura Nerurkar
First published: August 13, 2019, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading