मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर SEX करू शकतो का?

Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर SEX करू शकतो का?

Sex After Corona Vaccination : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहे?

Sex After Corona Vaccination : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहे?

Sex After Corona Vaccination : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहे?

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 एप्रिल : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, काय करायला हवं आणि काय टाळायला हवं, कोणत्या सवयी तात्पुरत्या स्वरूपात थांबवायला हव्यात. असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करू शकतो की नाही? (Sex After Corona Vaccination), कोरोना लस घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहे? सोशल मीडियावर याबाबत चर्चा होते आहे. आरोग्य मंत्रालयामार्फत मात्र याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत मात्र कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्यायला हवी, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोरोना लस घेणाऱ्या पुरुष आणि महिलांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर गर्भनिरोधकांचा वापर करायला हवा, असं तज्ज्ञ म्हणाले, SARS-CoV2 हा एक नवा व्हायरस आहे. त्याला निष्क्रिय करण्यासाठी लस तयार करण्यात आली आहे. पण या लशीचा दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहे आणि त्याचा पुरुष किंवा महिलांच्या सेक्सवर काय प्रभाव होतो हे अद्याप सांगणं अशक्य आहे. पण सेक्स न करणं हेसुद्ध शक्य नाही. त्यामुळे बचावात्मक मार्ग जरूर वापरावा, असं गाजियाबाझच्या कोलंबिया एशिया रुग्णालयातील इंटरनल मेडिसीन डॉ. दीपक वर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

हे वाचा - मोदी सरकारने फक्त 45+ व्यक्तींनाच कोरोना लस देण्याचा निर्णय का घेतला?

कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन आठवडे महिला आणि पुरुषांनी कंडोमसारख्या गर्भनिरोधकाचा वापर करणं योग्य आहे. कारण सेक्सदरम्यान शरीरातील द्रव घटक एकमेकांच्या संपर्कात येतात. लस आपल्याला कशा पद्धतीने प्रभावित करत आहे हे माहिती त्यामुळे कंडोमचा वापर करणं उत्तम आहे. तसंच महिलांनी कोरोना लस घेण्यापूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्लाही जरूर घ्यावा, असंही डॉ. दीपक म्हणाले.

हे वाचा - Corona Vaccination : मी डायबेटिक, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट रुग्ण आहे; मला कोरोना लस घेता येईल का?

1 एप्रिल, 2021 पासून देशात 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचं कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत आता पुन्हा बऱ्याच शंका लोकांच्या मनात आहेत.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Sex, Sexual health