डेंग्यूशी निगडीत या 7 गैरसमजांवर तुम्हीही ठेवत असाल डोळे बंद ठेवून विश्वास

डेंग्यूशी निगडीत या 7 गैरसमजांवर तुम्हीही ठेवत असाल डोळे बंद ठेवून विश्वास

अनेकदा डेंग्यूचा ताप आणि त्याची लक्षणं याबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. मात्र याबद्दल योग्य माहिती मिळवणं फार गरजेचं आहे.

  • Share this:

डेंग्यूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात वाढत चालली आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. फक्त तेलंगणामध्ये जानेवारी 2019 पासून आतापर्यंत 4 हजार 500 हून जास्त डेंग्यूचे रुग्ण समोर आले. शेजारील राष्ट्र पाकिस्तानातही डेंग्यूमुळे अनेक रुग्ण आजारी पडले आहेत. रिपोर्टनुसार, डेंग्युमुळे आतापर्यंत 59 हजार 739 लोक आजारी पडले आहेत. एवढंच नाही तर ही संख्या उत्तरोत्तर वाढत चालली आहे. मात्र अनेकदा डेंग्यूचा ताप आणि त्याची लक्षणं याबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. मात्र याबद्दल योग्य माहिती मिळवणं फार गरजेचं आहे.

डेंग्यू कोणताही मच्छर चावल्याने होतो-

हे पूर्णपणे चुकीचं आहे. डेंग्यू हा आजार फक्त मादा एडीज मच्छर चावल्याने होतो. याशिवाय डेंग्यूचा संसर्ग फक्त त्याच मादा एडीज मच्छरांपासून होतो ज्यांचे आधीच संक्रमण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही मादा एडीज मच्छर चावल्याने डेंग्यू होतो असं नाही.

डेंग्यूच्या तापाचा कोणताही धोका नाही-

डेंग्यूमध्ये सौम्य आणि गंभीर असे दोन प्रकार असतात. जर तुम्ही योग्य वेळी उपचार घेतले तर तुम्हाला सौम्य पद्धतीची लक्षणं दिसून येतात. उपचारात दिरंगाई झाली तर यकृत बिघाड, आंतरिक रक्तस्त्राव, विसरणं अशी अनेक लक्षणं दिसून येतात. या लक्षणांमुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

प्लेटलेट्स कमी म्हणजे डेंग्यू झाला-

प्लेटलेट्स कमी होणं हे डेंग्यूच्या आजाराच्या लक्षणांपैकी एक मुख्य लक्षण आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकवेळी प्लेटलेट्स कमी असणं म्हणजे डेंग्यू होतो. जर तुमचे प्लेटलेट्स कमी होण्याशिवाय ताप येत असेल तर डेंग्यूची संभावना सर्वात जास्त वाढते. पण जर फक्त प्लेटलेट्स कमी होत असतील तर तुम्हाला अन्य संसर्गजन्य रोगांनी आजारी पडलेले असू शकतात. पिवळा ताप, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया, एचआयवी, स्क्रब टाइफस यांसारखे आजार होऊ शकतात.

एकदा डेंग्यू झाल्यानंतर दुसऱ्यांदा होत नाही-

डेंग्यू वायरसचे चार सेरोटाइप असतात. DEN-1,2,3, आणि 4. जर तुम्हाला एकदा डेंग्यू होऊन गेला असेल आणि दुसऱ्यांदा झाला तर तो आधीच्या तुलनेत जास्त गंभीर असतो. विज्ञानात हे स्पष्ट झालं आहे की, एका व्यक्तिला जास्तीत जास्त चार वेळा डेंग्यू होऊ शकतो.

पपईच्या पानांनी डेंग्यू बरा होतो- असं अनेकांना वाटतं की, पपईच्या पानांचा उपयोग डेंग्यूच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर आहे. पण हा डेंग्यूच्या तापावरचा उपाय नाही. संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, पपईच्या पानांनी प्लेटलेट्स वाढायला मदत होते. पण हा काही डेंग्यू आजारावरचा उपचार नाही.

फक्त लहान मुलांना आणि वृद्धांना डेंग्यूचा संसर्ग होतो- वय, लिंग आणि सामाजिक आर्थिक स्थितीनुसार डेंग्यू होतो असं काही नाही. कोणालाही हा आजार होऊ शकतो.

घर स्वच्छ ठेवल्याने होत नाही डेंग्यू- घर स्वच्छ ठेवणं ही एक चांगली सवय आहे. डेंग्यू रोखण्याच्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे. मात्र याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही की घरातच तुम्हाला डेंग्यूचा संसर्ग होतो. तो कुठेही होऊ शकतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

 लक्षणांवरून ओळखा तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही

...म्हणून पंतप्रधान मोदी आहेत फिट, असा असतो त्यांचा दिवसभराचा हेल्दी आहार

या लक्षणांवरून ओळखा तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही

 

Published by: Madhura Nerurkar
First published: September 17, 2019, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading