Home /News /lifestyle /

'टाईम बँके'त जमा करा तुमचा रिकामा वेळ; म्हातारपणी कोणावर अवलंबून राहण्याची नाही गरज

'टाईम बँके'त जमा करा तुमचा रिकामा वेळ; म्हातारपणी कोणावर अवलंबून राहण्याची नाही गरज

Depositing Time In Bank will also Give Support In Old Age : या योजनेअंतर्गत, आज एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा करून, तुम्ही तो वेळ टाईम बँकेत सेव्ह करू शकता, जेणेकरून भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला गरज भासल्यास, तुमच्यासाठीही काही सेवा मिळू शकेल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 जानेवारी : नोकरी-व्यवसायामुळे तरुण मुलं घरापासून दूर किंवा विदेशातही जातात. अशा परिस्थितीत वृद्ध लोक घरात एकटे पडतात. त्यांची काळजी घेणारे कोणी नसते. कधीकधी कठीण काळात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासही विलंब होतो. WION मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही बाब लक्षात घेऊन स्वित्झर्लंड सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. 'टाइम बँक' असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत, आज एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा करून, तुम्ही तो वेळ टाईम बँकेत सेव्ह करू शकता, जेणेकरून भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला गरज भासल्यास, तुमच्यासाठीही काही सेवा मिळू शकेल. याचाच अर्थ म्हातारपणी आपल्यासोबत कोण असेल की, नाही याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी आजपासून थोडा वेळ काढून तो वेळ वृद्धापकाळात वापरता येईल. या अंतर्गत देशातील जनता गरजू वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते किंवा त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात. वृद्धांसोबत घालवलेला हा वेळ 'टाइम युनिट' म्हणून या स्वयंसेवकांच्या सामाजिक सुरक्षा खात्यात जमा होतो. अशा परिस्थितीत जेव्हा हे स्वयंसेवक वृद्धापकाळात पोहोचतील आणि अशी वेळ आली की त्यांनाही काही कामात मदतीची गरज भासणार असेल, तेव्हा टाइम बँक त्यांच्यासाठी स्वयंसेवकाची (Depositing Time In Bank will also Give Support In Old Age) व्यवस्था करेल. अशाप्रकारे, एखाद्या वृद्धाची सेवा केल्यानंतर त्यांनी जेवढा वेळ टाइम बँकेत जमा केला आहे, तेवढ्याच कालावधीसाठी त्यांना स्वत:साठीही मदत मिळू शकेल. स्वित्झर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने राबवलेली ही योजना खास एकटे राहणाऱ्या वृद्धांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये भारताची टाइम बँक आहे या संकल्पनेचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यामुळेच अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड, स्पेन आणि ग्रीस या देशांनीही ही योजना स्वीकारली आहे. सिंगापूरही लवकरच याची अंमलबजावणी करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, जर आपण भारताबद्दल बोलायचे झाल्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) समितीने 2018 साली आपल्या देशात ही योजना लागू करण्याची शिफारस केली होती. यानंतर, या समितीच्या सूचनांच्या आधारे, 2019 मध्ये, मध्य प्रदेश टाइम बँक उघडणारे भारतातील पहिले राज्य बनले. हे वाचा - Health Benefits of Desi Ghee: तूप खाल्ल्यानं वजन वाढत नाही? आरोग्यासाठी आहेत इतके फायदे टाईम बँकेसोबत तरुणाईही जोडली जात आहे वास्तविक, टाइम बँकेची ही संकल्पना पूर्णपणे व्यवहार मॉडेलवर आधारित आहे. या अंतर्गत आयटी सेवा, सल्ला, मुलांची काळजी, सलून, बागकाम, घर दुरुस्ती किंवा इतर वेळखाऊ काम अशा अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या कामांसाठी लागणारा वेळ टाईम बँकेद्वारे ट्रॅक केला जातो. हा वेळ युनिटच्या स्वरूपात संग्रहित केला जातो. हे वाचा - Omicron diet: कोरोनाची लक्षणं दिसताच खायला सुरू करा या गोष्टी; हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ टळेल तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केवळ मध्यमवयीन लोकच नाही तर स्विस तरुणही मोठ्या संख्येने टाइम बँकेत सामील होत आहेत. त्यांना विश्वास आहे की, त्यांच्या वाढत्या वयात त्यांना आधाराची देखील आवश्यकता असेल, तेव्हा त्यांनी कमावलेली ही वेळ कामी येईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या