... तर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच भारतात देणार CORONA VACCINE

... तर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच भारतात देणार CORONA VACCINE

भारतात 2021 पर्यंत कोरोना लस (corona vaccine) उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच लस मिळण्याचे संकेत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) , अॅस्ट्राझेनका (ASTRAZENECA) कंपनी आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं (serum institute of india) तयार केलेली कोव्हिशिल्ड (COVISHIELD) या कोरोना लशीचं (corona vaccine) तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. लशीच्या ट्रायलमधील सुरुवातीचे परिणाम सकारात्मक आले आहेत. त्यामुळे भारतात या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच लस दिली जाणार आहे. फक्त यासाठी ब्रिटनमधील अहवालाची प्रतीक्षा आहे.

भारतात कोव्हिशिल्ड लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याची प्रतीक्षा नाही. ब्रिटनमध्ये परवानगी मिळताच भारतात या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाईल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज करू शकतं, अशी माहिती भारतातील तज्ज्ञांनी दिली आहे.

दिल्लीतील एम्सचे (AIIMS) संचालक आणि भारतातील कोरोना लशीच्या टास्क फोर्समधील सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं, सीरम इन्स्टिट्युट कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी अर्ज करू शकतं. सीरम ब्रिटनमधील डेटा येण्याची वाट पाहत आहे. या डेटाच्या आधारावर इन्स्टिट्युट लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागू शकते. त्याचबरोबर ब्रिटनमध्ये जोपर्यंत डेटाला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण लशीला मान्यता देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

लशीवरील तज्ज्ञ समूहाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, या चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर डेटा तयार आणि शेअर केला जाणार आहे. तर अ‍ॅस्ट्रॅझेनेका कंपनीचा डेटा ब्रिटनमधील सरकारने ग्राह्य धरल्यास भारतातील सीरम इन्स्टिट्युटला स्वतःचा डेटा तयार करण्याची  गरज नाही, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.

हे वाचा - CORONA महासाथीचा अंत जवळ, WHO देणार गूड न्यूज; भारतीय तज्ज्ञांचा दावा

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाशी करार केला आहे. सीरम ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅझेनेका लशीचं  मोठ्या प्रमाणात उत्पादन  करत आहे.  सीरमने या लशीचे 4 कोटी डोस देखील तयार केले आहेत. त्याचबरोबर ही लस तिसऱ्या टप्प्यात 70 टक्के प्रभावी असल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे.

सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी याआधी न्यूज 18 शी बोलताना पूनावाला यांनीदेखील ब्रिटनकडून येणाऱ्या डेटाची प्रतीक्षा असल्याचं म्हटलं होतं. कोविशिल्ड लशीच्या सुरक्षिततेचा डाटा आणि ब्रिटनमधील ट्रायलचे निष्कर्ष या माहितीच्या आधारे सीरम इन्स्टिट्यिट ऑफ इंडिया कोविशिल्ड लशीच्या तातडीच्या परवानगीसाठी अर्ज करू शकतं.

हे वाचा - पहिल्यांदा कोणाला मिळणार लस? मोदींनी केलं स्पष्ट; उद्धव काय म्हणाले?

"कोविशिल्ड लस स्वस्त आहे. वाहतुकीस सोपी आणि कमी वेळात सर्वांना उपलब्ध होणार आहे. एका डोसमध्ये ही लस 90 टक्क्यांपर्यंत रुग्णाचं कोरोनापासून संरक्षण करेल आणि दुसऱ्या डोसमध्ये 62 टक्क्यांपर्यंत संरक्षण करेल, असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: November 24, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या