मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हीही जास्त फोन वापरता का?; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होतात 'हे' गंभीर दुष्परिणाम

तुम्हीही जास्त फोन वापरता का?; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होतात 'हे' गंभीर दुष्परिणाम

स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसलं की तासनतास ते वर येत नाही. इंटरनेटच्या मायाजालात तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी असतात. यामुळे अनेक गोष्टी दुरावल्या आहेत अशी निरीक्षणं तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.

स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसलं की तासनतास ते वर येत नाही. इंटरनेटच्या मायाजालात तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी असतात. यामुळे अनेक गोष्टी दुरावल्या आहेत अशी निरीक्षणं तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.

स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसलं की तासनतास ते वर येत नाही. इंटरनेटच्या मायाजालात तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी असतात. यामुळे अनेक गोष्टी दुरावल्या आहेत अशी निरीक्षणं तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट:  स्मार्टफोनमुळे (Smart Phone) आयुष्य खूप सोपं झालं आहे. अनेक गोष्टी फोनच्या माध्यमातून करणं शक्य झालं आहे. कोणती माहिती मिळवणं असो, ऑनलाईन खरेदी असो किंवा आर्थिक व्यवहार, स्मार्टफोनमुळे हे सगळं सहज घरबसल्या करता येतं. त्यामुळेच स्मार्टफोन ही सध्याच्या काळाची गरज झाली आहे. त्याच्या वाढत्या वापरामुळे स्मार्टफोनचे धोकेही हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर याचे दुष्परिणाम होत आहेत. स्मार्टफोनमुळे लोकांच्या वागण्यात प्रचंड फरक पडला आहे. लोकांमधले शिष्टाचार (Manners) कमी झाले आहेत. आत्मकेंद्री वृत्ती वाढू लागली आहे.

स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसलं की तासनतास ते वर येत नाही. इंटरनेटच्या मायाजालात तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी असतात. त्यांच्याकडे मानवी मन आकर्षित होतं. आणि आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो. समाजात कसं वागावं, संवाद कसा साधावा याची जाण कमी पडू लागली आहे. याला फबिंग (Phubbing) असं म्हणतात. समोरच्याशी बोलण्याऐवजी फोनमध्ये लक्ष घालणं म्हणजे फबिंग. यामुळे अनेक गोष्टी दुरावल्या आहेत अशी निरीक्षणं तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.

फोनच्या अतिवापरामुळे आपल्याही नकळत काय परिणाम होत आहेत वाचा.

आत्ममग्नता वाढते

फोनच्या अतिवापरामुळे मूड सतत बदलतात, असं संशोधन सांगतं. फोनमुळे स्वभाव आत्मकेंद्री होतो. आजूबाजूच्या घटना आपल्याला जाणवत नाहीत.

कुटुंबासोबत वेळ घालवणं कमी झालं

कुटुंबातल्या (Detachment With Family) प्रत्येकाचं स्वतःचं रुटीन असतं. शाळा, कॉलेज, नोकरी, घर अशा व्यापात दिवसातले अनेक तास जातात. उरलेला वेळ कुटुंबानं एकत्रित घालवण्यासाठी असतो, मात्र या वेळात फोन घेऊन बसलं, तर कुटुंबासोबत वेळ मिळत नाही. यामुळे कुटुंबापासून आपण दुरावतो आहोत.

नातेसंबंध बिघडतात

सतत मोबाईल घेऊन बसल्यामुळे आपल्याशी बोलणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होतं. मुलं, जोडीदार, नातेवाईक, मित्रमैत्रिणी कोणाचंच आपल्यासोबत असणं जाणवत नाही. यामुळे नातेसंबंध बिघडतात.

लहान मुलांवर दुष्परिणाम

लहान मुलं मोठ्यांकडे पाहून शिकत असतात. कुटुंबातील मोठ्यांना सतत फोनची सवय असेल, तर लहानांनाही ती सवय लागते. मग मुलं सतत मोबाईल देण्याचा आग्रह करतात. तो न मिळाल्यास कधीकधी मुलं गैरवर्तनही करतात.

मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यातलं आभासी जग खरं वाटू लागतं व खऱ्या समाजापासून आपण दुरावतो. नातेवाईक, कुटुंबियांना वेळ देणं (No Family Time) कमी होतं. याचा समाजावर दूरगामी परिणाम होतो आहे. इतरांशी बोलणं कमी झालं आहे. समाजात वावरतानाही मोबाईलमध्ये डोकं खूपसून बसल्यामुळे सामाजिक संवाद कमी झाला आहे.

पूर्वीसारखं एकमेकांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस करणं, ख्यालीखुशाली पाहणं आता होतच नाही. पत्र पाठवण्याचा काळही आता संपला. मोबाईल व इंटरनेटमुळे चॅटिंगच्या माध्यमातून कोणाशीही सहज व हवं तेव्हा बोलणं शक्य झालं हे खरं असलं, तरी फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून बोलणं कमी झालं आहे. यामुळे शिष्टाचार पाळणं कमी झालं. त्याची जाणीव कायम राखण्यासाठी स्मार्टफोनच्या वापरावर नियंत्रण ठेवणं जरुरीचं बनलं आहे, असंही तज्ज्ञ सांगतात.

First published:

Tags: Health, Lifestyle, Mobile Phone