मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

60व्या वर्षानंतरच्या गरजांसाठी योग्य मेडिक्लेम कसा निवडावा?

60व्या वर्षानंतरच्या गरजांसाठी योग्य मेडिक्लेम कसा निवडावा?

डिमेन्शिया लक्षणं हळूहळू दिसायला लागतात.

डिमेन्शिया लक्षणं हळूहळू दिसायला लागतात.

आयुष्याची 60 वर्षं पूर्ण होताना माणसाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जवळपास पूर्ण होत आलेल्या असतात; पण त्या वयात एका चिंतेने घोर लावलेला असतो, तो म्हणजे काही मोठं आजारपण आलं तर काय करायचं? अशा परिस्थितीत मेडिक्लेमचं (Mediclaim) नियोजन उपयुक्त ठरू शकतं

पुढे वाचा ...
मुंबई, 30 डिसेंबर :  निवृत्ती अर्थात रिटायरमेंट (Retirement) म्हणजे आपल्या आयुष्यातली काही फुरसतीची वर्षं. ज्या वेळी तुम्ही तुमच्या जीवनाच्या पुस्तकाचं एक पान बंद करून दुसरं नवं पान उघडता अशी वेळ म्हणजे निवृत्ती. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुम्हाला जसं वाटलं असेल, तशाच काहीशा भावना, चिंता, उत्सुकता या वेळीही वाटत असेल. बऱ्याचदा असं होतं, की आगामी काळातली अनिश्चितता आणि तणाव यांमुळे ही उत्सुकता केव्हाच संपून जाते. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करावे लागणारे मोठे खर्च या काळात चहूबाजूंनी घेरून टाकतात. 80व्या वर्षापर्यंत चांगलं जीवन जगता येऊ शकतं; पण त्यासाठीसुद्धा अनेक गोष्टींची आवश्यकता भासते. त्यासाठी खर्च होतोच. विकसित देशांप्रमाणे भारतात सामाजिक सुरक्षा किंवा आजीवन आरोग्य सुरक्षेसारखे पर्याय सर्व नागरिकांना उपलब्ध नाहीत. सरकारी नोकरीतून रिटायरमेंट झाली असेल, तर कर्मचारी विमासारख्या पर्यायाच्या माध्यमातून रिटायरमेंटनंतरही सुविधा मिळतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आरोग्य विमा योजना (Health Insurance Policies) उपलब्ध आहेत; मात्र त्यांनाही काही सीमा आहेत. अशा योजनांचा प्रीमियम (Premium) जास्त असतो, वेळोवेळी मेडिकल टेस्ट्स कराव्या लागतात, काही वेळा बऱ्याच काळापर्यंत थांबावं लागतं आणि को-पेमेंट (Co-Payment) अशा काही अडचणींचा त्यात समावेश आहे. सध्याच्या महागाईच्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण कमी होत आहे. त्यातच वाढत्या वयानुसार आरोग्यासाठी आवश्यक खर्च करावेच लागतात. म्हणजे दातांची तपासणी, डोळ्यांवरचे उपचार किंवा अन्य मासिक तपासण्या या गोष्टी असतातच. त्यातच अचानक एखादी मोठी आरोग्य समस्या उद्भवली तर त्यासाठीच्या खर्चाचं व्यवस्थापन करणं ही सोपी गोष्ट नाही. पण आमच्याकडे तुमच्याकरिता एक उत्तम कल्पना आहे. त्याद्वारे रिटायरमेंटनंतरही तुम्ही आरोग्यासाठीच्या खर्चाची तरतूद अगदी सहज करू शकाल. या छोट्या आणि सोप्या उपायामुळे तुम्ही निर्धास्त तर व्हालच; पण तुमचा आरोग्यसेवेवरचा खर्चही कमी होईल. थोडक्यात, बचतच बचत होईल. आरोग्यासाठी बचतीतले पैसे खर्च करू नका, दूरदृष्टी बाळगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर एक चांगला आरोग्य विमा खरेदी करा. तुम्ही जितक्या लवकर विमा खरेदी कराल, तितकं तुम्हाला कमी हप्त्यामध्ये जास्त रकमेचे फायदे मिळतील, तसंच को-पेमेंट कमी राखण्याचाही फायदा मिळेल. समजा तुम्ही तीस वर्षांचे आहात किंवा त्यापेक्षाही अधिक वयाचे आहात आणि तरीही आरोग्य विमा घेतला नसेल, तरीही जास्त प्रीमियम भरावा लागला तरी ही सुविधा घेणं लाभदायक आहे. त्यामुळे तुम्हाला मनःशांती आणि सुरक्षा (Security) या दोन्ही गोष्टी मिळतील. तुम्हाला रिटायर होण्यासाठी सात-आठ वर्षंच शिल्लक असतील, शिवाय तुमच्या संस्थेकडून तुम्हाला हेल्थ कव्हर (Health Cover) मिळालेलं असलं, तरी तुम्ही स्वतः एक आरोग्य विमा काढलेला असणं आवश्यक आहे. गंभीर आजारांतही कव्हर देणारा आणि रोजच्या गरजेसाठी दीर्घकाळपर्यंत टॉप-अप सुरक्षा देईल, अशा आरोग्य विम्याचीच निवड करणं योग्य ठरेल. उत्तम आरोग्य विम्याच्या प्लॅनमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात - - वैद्यकीय कारणांसाठी केलेला खर्च वेळेवर परत मिळणे (Reimbursement) - गंभीर आजाराच्या उपचारांवेळी लम्पसम पेमेंट (Lumpsum Payment) करण्याची सोय - हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना रोज कॅश पेमेंट (Cash Payment) - टॅक्समध्ये सवलत (Tax Benefit) तुम्हीही साठ वर्षांच्या या टप्प्यावर असताना इन्शुरन्स प्लान घेऊ इच्छित असाल, तर HDFC Lifeकडे तुमच्यासाठी खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. सहजपणे अॅड-ऑन, तुमच्या गरजांचा विचार करून, गंभीर आजारांवरच्या उपचारांसाठीचं कव्हरेज, सर्जरीचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च असे अनेक लाभ त्यात समाविष्ट आहेत. हे प्लान्स तुम्हाला वाटतं त्यापेक्षा कितीतरी सहज-सोपे आहेत. तुमच्यासाठी उपलब्ध असलेले सगळे प्लान्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि तुम्हाला पसंत पडेल तो प्लान खरेदी करा. टॅक्समध्ये सवलत मिळवण्यासाठी तुमचा चांगला पोर्टफोलिओ (Portfolio) तयार करा. आगामी काळाची तयारी करण्यासाठी आपला आरोग्य पोर्टफोलिओ अधिकाधिक चांगला बनवावा आणि त्यासाठी आपल्या बचतीचा चांगला उपयोग करावा. तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे हेल्थ इन्शुरन्स प्लान : तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर (Premium) इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 (डी) अनुसार आयकरात (Income Tax) 15 हजार रुपये (60पेक्षा कमी वय असलेल्यांना) सवलत मिळवू शकता. ज्येष्ठ नागरिक असाल, तर ही सवलत 20 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. 15 हजार रुपयांच्या अंतर्गत पाच हजार रुपयांची सवलतही मिळू शकते, जी हेल्थ चेकअपसाठी क्लेम केल्यानंतर मिळू शकते. गंभीर आजारावरील उपचार : किडनी (Kidney Fail) निकामी होणं, कॅन्सर (Cancer) किंवा एड्स (AIDS) होणं अशा गंभीर आजारांवरच्या उपचारांवर खर्च केला, तर 80 डीडीबी नुसार 40 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते. वयाच्या 60 वर्षांचा टप्पा पार केल्यानंतर ही सवलत 65 हजार रुपयांवर जाते. पीपीएफ : पीपीएफ (PPF) अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 80 सी अनुसार एक लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. त्यावर मिळणारं व्याज 10 (10) डी अनुसार करमुक्त असतं. मासिक प्राप्ती योजना : या प्रकारच्या गुंतवणूक योजनेतून आपल्याला मिळालेल्या उत्पन्नावर दीर्घ काळ टॅक्स आकारला जातो. तो इंडेक्सेशनसह 10 टक्के, तर इंडेक्सेशनशिवाय 20 टक्के आहे. तुम्हाला किती बचत करायची आहे आणि कशी सुरुवात करणं आवश्यक आहे, याचा हिशेब यावरून लावता येईल. भविष्यात तुमचे खर्च कोणते, कशा प्रकारचे आणि किती होतील, यासाठी विद्यमान स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. जेव्हा तुमच्याकडे किमान तीन वर्षांचा डेटा गोळा होईल, तेव्हा तुम्ही त्यात दर वर्षी 10 ते 15 टक्क्यांची वाढ करून अनुमान बांधू शकता. आपल्या जीवनशैलीशी (Lifestyle) निगडित असलेल्या आरोग्यविषयक जोखिमा, आपला स्वतःचा वैद्यकीय इतिहास, आनुवंशिक आजार यांबद्दल विचार करा. तुम्हाला आपल्या जोडीदाराच्या आरोग्यविषयक गोष्टींसाठीही विचार करणं गरजेचं आहे. भविष्यासाठी बचत करताना या गोष्टी या सगळ्या गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. समजा, तुमच्याकडे एक आरोग्य विमा असला, तरी आरोग्याची काळजी, पहिल्यांदाच किंवा नंतरही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा खर्च असे काही खर्च स्वतःच्याच खिशातून करावे लागतील. हेल्थ कव्हरची सुरुवात 15 ते 20 लाख बफरपासून करायला हरकत नाही. दरमहा 42 रुपये गुंतवून मिळवा आयुष्यभर पेन्शन, या सरकारी योजनेचा अनेकांना फायदा 60 वर्षांचे होईपर्यंत स्वतःचे स्वतःला विचारायचे काही प्रश्न - - तुमचा वैद्यकीय इतिहास आणि वर्तमान स्थिती पाहता तुमचं असलेलं कव्हरेज पुरेसं आहे का? - तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरकडे मोठं नेटवर्क आहे का, की जे तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रातही उपलब्ध आहे? - इमर्जन्सीची स्थिती आणि आधीपासून असलेले आजार यांबाबतीत तुम्हाला कोणत्या प्रकारची सुरक्षा मिळते आहे? आपण व्यतीत केलेलं आयुष्य पुन्हा आणू शकत नाही; पण तुम्ही तुमच्या आरोग्यासाठीच्या खर्चांचा अंदाज बांधू शकता, त्याआधारे बचत, गुंतवणुकीसाठी उत्तम नियोजन करू शकता. त्यामुळे तुमची रिटायरमेंटसाठीची बचत वैद्यकीयव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी शिल्लक राहू शकेल. HDFC Lifeवर लॉगिन करा आणि तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी सगळ्यात सुरक्षित आणि विश्वासार्ह वित्तीय सुरक्षा मिळवा. (हा मजकूर पार्टनर तत्त्वावरील आहे.)
First published:

Tags: Insurance

पुढील बातम्या