सेल्फीमुळे कळतील तुमची गुपितं, सांभाळून काढा PHOTO!

सेल्फीमुळे कळतील तुमची गुपितं, सांभाळून काढा PHOTO!

सध्या प्रत्येकाच्या हातात एक स्मार्ट फोन आहे. आता मोबाइलचा वापर फक्त फोन, मेसेज करण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी राहिला नसून आता याचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो.

  • Share this:

सध्या प्रत्येकाच्या हातात एक स्मार्ट फोन आहे. आता मोबाइलचा वापर फक्त फोन, मेसेज करण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी राहिला नसून आता याचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. यातही तरुणाईमध्ये सेल्फी घेणं हे एक महत्त्वाचं कारण झालं आहे. फोटो काढण्यासाठी पूर्वी इतरांची मनधरणी करावी लागायची. पण आता तसं राहिलं नाही. जिथे जागा आवडली तिथे तरुणाई सेल्फी काढू शकते. प्रत्येक सेल्फीसोबत वेगळी स्टाइल, अँगल आणि पोजही तरुणाईकडे असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, सेल्फी तुमच्याबद्दल खूप काही सांगत असते.

कॉम्प्यूटर इन ह्यूमन बिहेविअर नावाच्या एका जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, तुम्ही ज्या प्रकारे सेल्फी घेता त्यावरून तुमची स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व कळतं. या सर्वेत दररोज सेल्फी काढणारे 123 लोक सहभागी झाले होते. या शोधात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गहन संशोधन करण्यात आलं.

संशोधकांनी सेल्फीच्या पोज, स्टाइल आणि जागा यांसोबतच अन्य 13 गोष्टींचाही विचार केला. यातूनच सेल्फी घेणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करण्यात आलं. यातून पुढील गोष्टी समोर आल्या.

जे लोक सेल्फी घेताना पाउट किंवा बदकासारखा चेहरा करतात ते भावनिकरित्या अस्थिर असतात असं मानण्यात आलं आहे. यासोबतच लोकांना त्यांच्या मूडनुसार काम करणारेही मानण्यात आलं आहे. असं असलं तरी यातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांनाच लागू होईल असं काही गरजेचं नाही. मात्र संशोधनात जे सहभागी झाले त्यांचं व्यक्तिमत्त्व काहीसं असंच होतं.

काही लोक सेल्फी घेताना जीभ बाहेर काढतात. संशोधनात अशा लोकांचा स्वभाव हा मस्तीखोर असल्याचं सिद्ध झालं आहे. असे लोक अनेकदा छोट्या- छोट्या गोष्टींवर मजा- मस्ती करताना दिसतात. हे लोक मनमुराद पद्धतीने आयुष्य जगायला प्राधान्य देतात.

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

सावधान! तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपता? आजच बदला ही सवय

VIRAL VIDEO: या गावात दिसली सात तोंडी सापाची कात, लोकांनी वाहिलं हळद- कुंकू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या