OMG VIDEO : सेल्फीवेड्या लोकांसाठी हे आहे 3 D सेल्फी म्युझियम!

OMG VIDEO : सेल्फीवेड्या लोकांसाठी हे आहे 3 D सेल्फी म्युझियम!

या 3 D आर्ट म्युझियममध्ये तुम्ही माकडापासून ते मोनालिसापर्यंत... कुणासोबतही सेल्फी काढू शकता. ज्याला कुणाला पेंटिंगसोबत फोटो काढायचा असेल त्याला ते पेंटिंग आपल्या पोझने पूर्ण करावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : आजच्या मोबाइलच्या जमान्यात तुम्हाला अवतीभवती सगळेच जण सेल्फी काढताना दिसतील. सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करायचा आणि मग त्याचे लाइक्स मोजत बसायचे हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा छंद असतो.अशाच सेल्फीवेड्या लोकांसाठी सुरू झालंय एक सेल्फी म्युझियम. चेन्नईसोबतच आता हे म्युझियम दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्येही आहे. या 3 D आर्ट म्युझियममध्ये तुम्ही माकडापासून ते मोनालिसापर्यंत... कुणासोबतही सेल्फी काढू शकता. ज्याला कुणाला पेंटिंगसोबत फोटो काढायचा असेल त्याला ते पेंटिंग आपल्या पोझने पूर्ण करावं लागतं. इथे तुम्हाला मगरीसोबत कुस्तीही खेळता येते आणि चार्ली चॅप्लिनला प्रपोझही करता येतं!

ए. पी. श्रीधर या कलाकाराने पहिल्यांदा चेन्नईमध्ये हे म्युझियम सुरू केलं. ही 3 D पेटिंग्ज बनवणं वाटतं तेवढं सोपं नाही. पहिल्यांदा ही चित्रं 2 D मध्ये बनवली जातात. मग लायटिंग आणि सावल्यांच्या खेळामुळे ती 3 D दिसतात.

2016 मध्ये सुरू झालेल्या या सेल्फी म्युझियममध्ये आतापर्यंत सुमारे 40 लाख लोकांनी सेल्फी काढले आहेत. आता तर हे म्युझियम सिंगापूर, कॅलिफोर्निया, मलेशियामध्येही सुरू झालं आहे.

लोकांनी चित्रकलेचा आस्वाद घ्यावा, चित्रं पाहतापाहता रंगांमध्ये बुडून जावं हा या सेल्फी म्युझियमचा उद्देश. ए. पी. श्रीधर यांनी सेल्फीच्या माध्यमातून सगळ्यांनाच या चित्रांची गोडी लावली आहे.

या हायटेक युगात आपल्या कलेला अपग्रेड करण्याची त्यांची हातोटी आणि आपल्याच चित्रासोबत त्यांनी काढलेल्या सेल्फीला एक लाइक तर बनतोच, नाही का?

=====================================================================================

पाहा VIDEO : Zomato नंतर नवा वाद, मुस्लीम अँकरला पाहून डोळे केले बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 09:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading