मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सावधान! तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना?

सावधान! तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना?

बहुतेक फेसबुक य़ुझर्सची Selene Delgado Lopez ही फ्रेंड आहे. जिला अनफ्रेंडही करता येत नाही.

बहुतेक फेसबुक य़ुझर्सची Selene Delgado Lopez ही फ्रेंड आहे. जिला अनफ्रेंडही करता येत नाही.

बहुतेक फेसबुक य़ुझर्सची Selene Delgado Lopez ही फ्रेंड आहे. जिला अनफ्रेंडही करता येत नाही.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 06 सप्टेंबर : Selene Delgado Lopez सध्या बहुतेक फेसबुक (facebook) युझर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाव दिसतं आहे. विशेष म्हणजे ती कोण आहे हे कुणाला माहिती नाही. ती कुणाच्या ओळखीची नाही, कुणाला भेटली नाही किंवा तिचं नावही कधी कुणी ऐकलं नाही. तिने फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली नाही. तरी ती कित्येक जणांच्या facebook friend list मध्ये आहे. कदाचित ती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमध्येही असावी. सेलीन डेलगाडो लोपेज ही बहुतेक फेसबुक युझर्सची फ्रेंड आहे. Selene Delgado Lopez हे रहस्यमय FB ACCOUNT. या अकाऊंटवर एका हसऱ्या महिलेचा फोटो आहे. तिचे केस शॉर्ट आहेत. तिने केशरी रंगाचा टॉप घातला आहे. तिच्या फेसबुक प्रोफाइल तुम्ही पाहिलं तर ती मेक्सिकोतील गुआनजुआटोतल्या लिओन शहरातील रहिवाशी असल्याचं दाखवतं. विशेष म्हणजे तुम्ही तिला तिला अनफ्रेंड करू शकत नाही. हे फेसबुक पेज नाही तर एका व्यक्तीचं अकाऊंट आहे, तरी तिच्या प्रोफाइलवर Add Friend हा पर्याय नाही. तिथं थेट "send message हा पर्याय दिसतो. काही फेसबुक युझर्स आपल्या फ्रेंडच्या फ्रेंड्सपुरतं Add Friend पर्याय मर्यादित ठेवतात. त्यावेळी कॉमन फ्रेंड्स नसल्यास फक्त send message पर्याय दिसतो. मात्र हे अकाऊंट आपल्या फ्रेंडचं असलं तरी तिच्या अकाऊंटवर Add Friend ऐवजी send message दिसतं. हे वाचा - बर्फात सर्वाधिक वेळ राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड; फक्त PHOTO पाहूनच अंगावर येईल काटा दरम्यान प्रत्येकाच्या फ्रेंड लिस्टमध्ये ती असेल असं नाही. कारण फेसबुक युझर्स लाखो आहेत आणि एका व्यक्तीला फक्त 5,000 फ्रेंड्सना स्वीकारता येतं. त्यामुळे कदाचित ती सर्वांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल असं नाही, असं मानलं जातं आहे. कोण आहे सेलीन डेलगाडो लोपेज एका रिपोर्टनुसार, या नावाची एक महिला जवळपास 30 वर्षांपूर्वी गायब झाली. मॅशेबलच्या रिपोर्टनुसार कॅनल 5 या मेक्सिकन न्यूज चॅनेलमध्ये जाहिरातीदरम्यान तिचं नाव हरवलेल्या व्यक्तींच्या यादीत दाखवण्यात आलं होतं. हे वाचा - चीनी PUBG ऐवजी आता भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारने केली घोषणा चॅनेलजच्या प्रमोशनसाठी काही कालावधीसाठी मध्यरात्री 3 वाजता सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडीओ पब्लिश करण्यात आला होता. जो सोशल मीडियावर खूपच ट्रेंडमध्ये होता. त्यानंतर या फोटोसह अनेक फेक अकाऊंट बनल्याचं सांगितलं जातं. Selene Delgado Lopez FB ACCOUNT पासून काय धोका? सध्या तरी या फेसबुक अकाऊंटपासून कोणता धोका झालेला नाही. मात्र हे अकाऊंट इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे अगदी कमी कालावधीत सायबर सिक्युरिटीचा धोका उद्भवू शकतो असं सांगितलं जातं. या अकाऊंटमार्फत चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते किंवा काही लिंक टाकून इंटरनेट घोटाळा केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे तुम्हीदेखील सावध राहा.
First published:

Tags: Facebook, Social media, Viral

पुढील बातम्या