Home /News /lifestyle /

मदत मागताना विचार करू नका, Personality सुधारण्याचा हा आहे एक मार्ग

मदत मागताना विचार करू नका, Personality सुधारण्याचा हा आहे एक मार्ग

WWoofing, HelpX, Workaway या कंपन्यांनी वर्क एक्सचेंज प्रोग्रॅम सुरू केला आहे. यात तुमच्या फिरण्याची आवड पूर्ण करता येते. मात्र तुम्हाला आठवड्यातून ठराविक वेळ काम करावं लागेल. यामध्ये पारंपरिक काम, शेतीचे काम किंवा लहान मुलांची देखभाल यासारखी कामे नसतील.

WWoofing, HelpX, Workaway या कंपन्यांनी वर्क एक्सचेंज प्रोग्रॅम सुरू केला आहे. यात तुमच्या फिरण्याची आवड पूर्ण करता येते. मात्र तुम्हाला आठवड्यातून ठराविक वेळ काम करावं लागेल. यामध्ये पारंपरिक काम, शेतीचे काम किंवा लहान मुलांची देखभाल यासारखी कामे नसतील.

एखाद्याची मदत (Help) हवी असेल, तर आपण त्याच्याकडे मदत मागण्याआधी खूप विचार करतो.

  फिनिक्स, 4 फेब्रुवारी : प्रत्येकाकडे सर्वकाही असतंच असं नाही. आयुष्याच्या एखाद्या वळणावर तरी कुणाची ना कुणाची आपल्याला मदत लागते. काही जण बिनधास्त हक्काने मदत मागतात. तर काही जणांना मदत मागणं म्हणजे कमीपणाचं वाटतं. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार मदत मागितल्याने तुमची पर्सनॅलिटी (Personality) म्हणजे व्यक्तिमत्व सुधारतं.अनेकदा आपण मदत मागायच्या आधी विचार करतो. मात्र मदत मागितल्याने तुमची पर्सनॅलिटी सुधारते, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ एरिजोनाच्या (University of Arizona)  संशोधकांनी हा अभ्यास केला. हा अभ्यास जर्नल ऑफ रिसर्च इन पर्सनॅलिटीमध्ये (Journal of Research in Personality) प्रसिद्ध करण्यात आला आहे. हेदेखील वाचा - पालकांनो, बदामासह मुलांना गुलाबही द्यायला विसरू नका संशोधनादरम्यान काय दिसून आलं? एखाद्याकडून मदत घेतल्याने मदत करणारा व्यक्ती तुम्ही ज्यासाठी मदत घेतली आहे, त्या लक्ष्याची आठवण करून देतो मदत घेतल्याने तुम्हाला तुमचं लक्ष्य लक्षात राहतं ज्यासाठी मदत घेतली ते लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता यामुळे तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं हेदेखील वाचा -   महाभयंकर कॅन्सरला दूर ठेवायचं आहे... मग फक्त 20 मिनिटं चाला  व्यकित्वमत्वामध्ये होतात बदल असं म्हणतात की, एखाद्याचं व्यक्तिमत्व कायम असतं, ते बदलू शकत नाही. मात्र या नव्या संशोधनासुसार, व्यक्तिमत्वामध्ये आयुष्यभर बदल होत असतात. जीवनात घडणाऱ्या घटनांमळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलतं. कॉलेजमध्ये जे लोक जास्त कर्तव्यनिष्ठ असतात आणि प्रत्येक गोष्टीशी सहमत असतात ते लग्नानंतर कमी बहिर्मुख होतात. तर सेवानिवृत्तीनंतर पुन्हा प्रत्येक गोष्टीशी सहमत होतात. काय मग आता मदत मागायला अजिबात लाजू नका. तुम्हाला कुणाची मदत हवी तर मागचा पुढचा विचार न करता बिनधास्त मदत मागा. कारण ही मदत तुम्हाला Personaily सुधारण्यासाठी मदत करेल.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Help, Lifestyle

  पुढील बातम्या