नवी दिल्ली, 03 डिसेंबर : तुळशीच्या बियांचे फायदे (Basil Seeds Benefits): तुळशीच्या पानांच्या (Tulsi leaves) फायद्यांबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीच्या बियांचं सेवन केल्यानं सुद्धा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्यासह कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर तुळशीच्या बियांचं सेवन प्रभावी ठरतं. तुळशीमध्ये असलेले औषधी गुणधर्म (medicinal properties of Tulsi) अनेक आजारांना दूर ठेवतात. झी न्यूजनं यासंदर्भात वृत्त दिलंय.
रोग प्रतिकारशक्तीसाठी
प्रथिनं, फायबर आणि लोह याव्यतिरिक्त, तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट (anti-oxidant) असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे (free radicals) होणारं नुकसान टाळतात. या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक असतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि फ्लूच्या (cold and flu) समस्येमध्ये तुळशीच्या बियांचा काढा पिणं किंवा चहा पिणं फायदेशीर ठरेल.
पोटाच्या समस्या
तुळशीच्या बियांचं सेवन केल्याने पचनक्रिया (digestion) चांगली राहते. यामुळं बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा अपचनाच्या समस्येत आराम मिळेल. याच्या बिया काही वेळ पाण्यात ठेवा आणि नंतर हे पाणी सेवन करा. याचा फायदा होईल.
हे वाचा -
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हे सोपे उपाय आहेत फायदेशीर, 10 वर्षे कमी वयाचे दिसाल
सूज आणि जळजळ कमी होते
जर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची सूज किंवा जळजळ होत असेल तर, तुळशीच्या बियांचं सेवन केल्यानं फायदा होतो. तुळशीच्या बियांमध्ये दाह-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळं शरीरातीलया समस्यांमध्ये आराम मिळतो.
वजन कमी करण्यात प्रभावी
वजन कमी करण्यासाठीही (weight loss) तुळशीच्या बियांचं सेवन खूप फायदेशीर मानलं जातं. तुळशीच्या बियांमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर असतं. त्या खाल्ल्यानं जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या बियांपासून तुम्ही ग्रीन टी (green tea) बनवू शकता. याचे नियमित सेवन केल्यास फायदा होईल.
हे वाचा -
खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज
तणाव (stress) दूर होईल
तुळशीच्या बियांचं सेवन केल्यानं तणाव दूर होण्यासही फायदा होतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.