• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • OMG! डास अशी देतात अंडी? VIDEO पाहूनच हैराण व्हाल

OMG! डास अशी देतात अंडी? VIDEO पाहूनच हैराण व्हाल

मादा डास अंडी घालतानाचा व्हिडीओ व्हायरल.

 • Share this:
  मुंबई, 08 ऑक्टोबर : डास (Mosquito) तसे आपल्यासाठी नवे नाहीत. विशेषतः पाऊस सुरू होताच डासांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात (Mosquito born disease) . साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते (Mosquito video) . या पाण्यात डासांच्या अळ्या असतात असं सांगितलं जातं. पण कधी विचार केला आहे का? की डास नेमकी अंडी कशी घालतात (Mosquito egg video) . आता तर थेट व्हिडीओच पाहा (Mosquito laying egg video) . सोशल मीडियावर (Social media) एका मादा डासाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ही मादा डास अंडी घालताना दिसतो आहे व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. व्हिडीओत पाहू शकता मादा डास आपल्या मागच्या बाजूने एकामागोमाग एक अंडी घालते आहे.तिने बरीच अंडी घातली आहेत. ही अंडी ती फक्त टाकत जाते असं नाही तर ती एका रांगेत ती लावते आहे. विशेष म्हणजे ही सर्व अंडी ती उभी ठेवते. आपल्या अंड्यांना कोणतंही नुकसान पोहोचू नये आणि त्यातून वेळेत अळ्या बाहेर पडाव्यात यासाठी ती असं करतं. हे वाचा - OMG! छोट्याशा खारीने भयंकर सापाला अक्षरशः कुरतडलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO डासांपासून बचावासाठी आपण बरेच उपाय करतो. क्वाइल, क्रीम, मच्छरदाणी काय काय नाही वापरत. तरी डास काही आपला पिच्छा सोडत नाही. त्यांच्यापासून पूर्णपणे सुटका मिळवणं अनेकदा कठीण होतं. याचं कारण म्हणजे डासांची मोठ्या प्रमाणात होणारी पैदास आणि डासांची पैदास इतक्या मोठ्या प्रमाणत का होते हे या व्हिडीओतून तुम्हाला समजलंच असेल. @RebeccaH2030 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - `ही` मॉडेल 15 कोटींची संपत्ती करणार पाळलेल्या कुत्र्याच्या नावावर माहितीनुसार एका नर डासाचं आय़ुष्य फक्त दहा दिवसांचं असतं. पण मादा डास जवळपास 40 ते 50 दिवस जिवंत राहते. मादा डास फक्त एकदाच संबंध बनवते आणि एकाच वेळी जवळपास 200 ते 500 अंडी देते.
  Published by:Priya Lad
  First published: