फ्लॅट पाहण्यासाठी गेला, किचनचा दरवाजा उघडला आणि बसला शॉक; असं काय होतं तिथं पाहा VIDEO

या छोट्याशा किचनमध्ये असं काही दडलं होतं जे सहजासहजी दिसू शकत नाही.

या छोट्याशा किचनमध्ये असं काही दडलं होतं जे सहजासहजी दिसू शकत नाही.

  • Share this:
    मुंबई, 12 डिसेंबर : नवं घर घ्यायचं आहे. ते पाहण्यासाठी उत्साहानं तुम्ही जातं. मात्र त्या घरात असं काही तरी सापडतं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसावी तर.. असंच काहीसं घडलं ते एका व्यक्तीसोबत. ही व्यक्ती नवा फ्लॅट पाहायला गेली. किचनमध्ये गेली. किचनमध्ये दरवाजा उघडला आणि तिथं असं काही सापडलं ज्याचा विचारही कुणी करू शकत नाही. या छोट्याशा किचनमध्ये असं काही दडलं होतं जे सहजासहजी दिसू शकत नाही. या व्यक्तीनं ते पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. जॅमी विल्क्स नावाच्या ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. जॅमी एक फ्लॅट पाहायला गेला होता. घर अगदी निरखून पाहत होता. किचनमध्ये गेला. किचन तसं रिकामंच होतं. पण जॅमीला तिथं असं काही सापडलं जे पाहिल्यानंतर त्याचे डोळे उघडेच राहिले.  सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता किचनच्या वरील फरशी उचल्यानंतर किचनखालील कपाटाचा दरवाजा खोलल्यानंतर तिथून एक रस्ता दिसत (Guy Found Secret Doorway With Stairs Hidden In Kitchen) होता. हा एक छुपा मार्ग होता. किचनखालून जिने गेले होते. हा रस्ता अपार्टमेंटच्या बॅक गार्डनकडे बाहेर पडत होता. असे भुयार किंवा छोटे भुयारी मार्ग आपण नेहमी फिल्ममध्येच पाहत आलो आहोत. कुणाच्या तरी घरात असा छुपा मार्ग असतो. पोलिसांनी धाड टाकली की व्हिलनच्या घरात पळण्यासाठी असा मार्ग बनवलेला असतो. प्रत्यक्षातही एका फ्लॅटमध्ये असा हा छुपा मार्ग तयार करण्यात आला होता.
    Published by:Priya Lad
    First published: