Home /News /lifestyle /

कोरोनाची दुसरी लाट घातक नाही पण...; महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

कोरोनाची दुसरी लाट घातक नाही पण...; महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

15 फेब्रुवारी, 2021 पासून आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोना केसेस (coronavirus in maharashtra) चौपट झाले आहेत तर आठवड्याची प्रकरणं तिपटीने वाढली आहेत.

  मुंबई, 21 मार्च : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर (Coronavirus Second Wave in Maharashtra) थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणं (Second in Maharashtra) आहे. महाराष्ट्राची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा महाराष्ट्रात कोरोनाचे तितकेच रुग्ण येत आहे. कोरोनाची दुसरी वाट येत्या काळात काय काय करू शकते, याबाबत महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी  90 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची ही प्रकरणं फार गंभीर नाहीत पण कोरोनाव्हायरस आता युरोपप्रमामे वेगाने पसरतो आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मुंबईतल्या बीएमसी रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोव्हिड वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थिती पुन्हा बिघडते आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयांतील सर्व कोविड वॉर्ड भरले आहेच. डॉ. प्रिन्स सुराना यांनी सांगितलं, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही चेंबूरमधील रुग्णालयातील बेडची संख्या कमी करण्याचा विचार करत होतो. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व बेड फूल झाले. आमचे  9 वेंटिलेटरदेखील फूल आहेत. हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड, 24 तासांत सर्वाधिक रुग्ण राज्याच्या आरोग्य विभागातील एपिडेमिओलॉजीचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं, महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट सध्या जास्त घातक नाही. पण यावेळी व्हायरस युरोपसारखा तेजीने पसरत आहे. महाराष्ट्रात 15 से 21 फेब्रुवारीपर्यंत मृत्यू दर 0.7% होता. जो 15-20 मार्च या कालावधीत 0.32% झाला आहे. 15 फेब्रुवारीपासून आतापर्यंत कोरोना केसेस चौपट झाले आहेत तर आठवड्याची प्रकरणं तिपटीने वाढली आहेत. हे वाचा - महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची होणार तपासणी राज्यात शनिवारी सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 27,126 नवी कोरोना प्रकरणं आढळली. गुरुवारी ही संख्या  25,833 होती. आता राज्यात एकूण 24,49,147 कोरोना रुग्ण आहेत. 53,300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 22,03,553 रुग्ण बरे झाले आहेत आणि 1,91,006 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या