मजबूत हाडांसाठी समुद्री मीठ उपयुक्त, जाणून घ्या इतर 5 महत्त्वाचे फायदे

मजबूत हाडांसाठी समुद्री मीठ उपयुक्त, जाणून घ्या इतर 5 महत्त्वाचे फायदे

चिमूटभर समुद्री मिठाचा वापर केल्याने केवळ पदार्थाची चव वाढत नाही, तर प्रक्रिया न केलेले मीठ असल्याने यातील आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि खनिजे फायदेशीर ठरतात. जाणून घ्या रोजच्या जीवनात याचा वापर केल्यास कोणते फायदे होतील

  • Last Updated: Sep 25, 2020 04:36 PM IST
  • Share this:

समुद्री मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून नैसर्गिकरित्या प्राप्त होणाऱ्या मिठाचा शुद्धतम प्रकार आहे. सामान्य मीठाच्या उलट, हे मीठ आयोडाईझ केलेले नसते. समुद्र आणि तलावांच्या खाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन आणि फिल्टरद्वारे हे मीठ तयार केले जाते. या प्रकारचे मीठ खाडीचे मीठ किंवा सौर मीठ म्हणून देखील ओळखले जाते. चिमूटभर समुद्री मिठाचा वापर केल्याने केवळ पदार्थाची चव वाढत नाही, तर प्रक्रिया न केलेले मीठ असल्याने यातील आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि खनिजे फायदेशीर ठरतात.

प्रत्येकाला माहित आहे की शरीरात इलेक्ट्रोलाइट सामग्रीचे संतुलन ठेवण्यासाठी, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोडियमच्या मिठाचे सेवन करणे गरजेचे आहे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणतात की जेव्हा समुद्राचे खारे पाणी वाळवले जाते तेव्हा समुद्री मीठ तयार होते. हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर ठरत नाही तर त्वचा आणि केसांसाठीही बरेच लाभदायी आहे.

हाडे मजबूत होतात

समुद्री मिठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे पीडित लोकांसाठी वेदना आणि जळजळ कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बर्‍याच संशोधकांनी असे म्हटले आहे की समुद्री मिठाचे सेवन केवळ आहारा मार्फतच नाही तर ते पाण्याबरोबर करणे फायदेशीर आहे. तुम्ही पिण्याच्या पाण्यात, आंघोळीच्या पाण्यात या मिठाचा वापर करू शकता. यामुळे संधीवात आणि ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी  होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

myupchar.comच्या डॉ. आकांक्षा मिश्रा म्हणतात की रोग प्रतिकारशक्ती शरीरात कोणत्याही प्रकारच्या सूक्ष्मजीवांविरूद्ध लढण्याची क्षमता देते. समुद्री मीठाचे क्षारीय गुणधर्म जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग दूर ठेवण्यास मदत करतात. तसेच, झिंक, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयोडीन सारख्या आवश्यक खनिज पदार्थांची उपस्थिती शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. समुद्री मिठामध्ये पोषक आणि खनिज पदार्थांचे योग्य प्रमाण असते. ज्यामुळ संसर्ग, ताप, सर्दी आणि फ्लू दूप ठेवण्यास मदत होते.

हृदयाच्या कार्यांमध्ये सुधार

समुद्री मीठ सोडियम आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे जो सामान्य हृदयाचे ठोके टिकवून ठेवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य वाढविण्यास महत्त्वपूर्ण घटक आहे. सामान्य मीठापेक्षा समुद्री मीठ रक्तदाब वाढवत नाही. बर्‍याच संशोधनातून असे सूचित केले गेले आहे की नियमित आहारात सामान्य मीठाऐवजी एक चिमूटभर समुद्री मीठ उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी उल्लेखनीय परिणाम दर्शविते.

पचन सुधारते

पचनक्रिया सुधारण्यात समुद्री मीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हायड्रोक्लोरिक अॅसिड्सचे योग्य विमोचन न झाल्यामुळे अपचन, पोट फुलणे, पोटात गोळा येणे, पोटात जळजळ होणे, सूज येणे इत्यादींसह पोटातील अनेक आजार होऊ शकतात. अशावेळी समुद्री मीठाला खूप महत्त्व आहे कारण यामुळे पोटाला हायड्रोक्लोराईड अॅसिड्स तयार करण्यास उत्तेजन मिळते जेणेकरून अन्नाची मोडतोड अर्थात विभाजन होण्यास मदत होते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

समुद्री मिठाच्या साहाय्याने त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. हे शरीरातील सर्व विषारी द्रव बाहेर टाकू शकते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहते. त्वचेव्यतिरिक्त हे केसांसाठी देखील वापरले जाऊ शकते. तेलकट केसांसाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. हे मीठ कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 25, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading