बछडा शिकतोय शिकाराची टेक्निक, आईवरच केलेल्या हल्ल्याचा पाहा VIRAL VIDEO

बछडा शिकतोय शिकाराची टेक्निक, आईवरच केलेल्या हल्ल्याचा पाहा VIRAL VIDEO

प्राणीसंग्रालयात बछड्यानं केला आईवरच हल्ला, व्हिडीओ झाला व्हायरल.

  • Share this:

स्कॉटलॅंड, 15 ऑक्टोबर : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. यात सिंह आणि वाघाचे व्हिडीओ असतील तर त्याला लाखो शेअर असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धिंगाणा घालत आहे. स्कॉटलॅंडच्या अॅडिंगबर्ग जुमधला (Edinburgh Zoo) हा व्हिडीओ पाहुन तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येईल.

हा व्हिडीओ स्कॉटलॅंडच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. यात एका सिंहाचे बछडे आपल्या आईवरच हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यात सिंहाचा बछडा हळुच आपल्या आईच्या मागून आला आणि अचानक आईला मागून पकडले. बछडाच्या हल्ल्यानं आईही घाबरली आणि जागेवरच उभी राहिली. दरम्यान व्हिडीओमधून हा बछडा शिकार करण्याची कला शिकत असल्याचे दिसत आहे. हा सुंदर व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. जो सोशल मीडियावर सध्या सगळ्यांच्या व्हॉलवर दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत एकानं, “मुलं झाल्यानंतर तुम्ही आराम करता आणि...”,असे कॅप्शन दिले आहे. बरेच आई-बाबा या मताशी सहमत आहेत.

वाचा-पहावं ते नवलंच! खिडकीची काच तोडून महिलेवर सांबारने मारली उडी, VIDEO VIRAL

वाचा-कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIDEO

हा व्हिडीओ शुक्रवारी शेअर करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख युझरनं शेअर केला आहे. Fox Newsनं दिलेल्या बातमीनुसार, रॉबर्ट नावाच्या सिंहीणीनं ऑगस्टमध्ये पाच बछड्यांना जन्म दिला. दुर्दैवी म्हणजे यातील 3 बछडे वाचले आहेत. 2012मध्ये त्यांना स्कॉटलॅंडच्या अॅडिंगबर्गच्या प्राणी संग्रालयात आणले.

वाचा-कुत्र्यांच्या या संकेतांकडे लक्ष द्या, नाही तर तिजोरी होईल रिकामी

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

Published by: Priyanka Gawde
First published: October 10, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading